Ganeshotsav : प्रशासनाच्या नियोजनामुळे गणपतीच्या उत्सवाची सांगता निर्विघ्नपणे पार

Ganeshotsav : प्रशासनाच्या नियोजनामुळे गणपतीच्या उत्सवाची सांगता निर्विघ्नपणे पार

0
Ganeshotsav : प्रशासनाच्या नियोजनामुळे गणपतीच्या उत्सवाची सांगता निर्विघ्नपणे पार
Ganeshotsav : प्रशासनाच्या नियोजनामुळे गणपतीच्या उत्सवाची सांगता निर्विघ्नपणे पार

Ganeshotsav : संगमनेर: गणेश उत्साहाची (Ganeshotsav) मंगळवारी (ता.16) भावपूर्ण वातावरणात सांगता झाली. मुख्य विसर्जन मिरवणुकीत अबालवृद्धांनी ठेका धरीत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण नयनांनी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला. मध्यरात्री एक वाजता गणरायाचे विसर्जन (Ganesh Visarjan) झाले. प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे या उत्सवाला कोणतेही गालबोट लागले नाही.

Ganeshotsav

नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके

सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाची 128 वर्षांची परंपरा (Ganeshotsav)

128 वर्षांची परंपरा लाभलेल्या मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या गणरायाची सकाळी साडेआठ वाजता माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक जयश्री थोरात, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शहरातील मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत मानाच्या गणरायाचे पूजन करून संगमनेरच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार

बारा तासांनी मानाच्या गणरायाचे विसर्जन (Ganeshotsav)

सजविलेल्या पालखीत विराजमान मानाचा गणपती, त्यापुढे, ढोल-ताशांचा गजर, झांझ पथक, लाठी काठी नृत्य अशा शाहीथाटात सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाची मिरवणूक सकाळी 9 वाजता सुरु झाली. सायंकाळी साडेसात वाजता पालिकेचा सत्कार स्विकारुन रात्री 9 वाजता बारा तासांनी मानाच्या गणरायाचे विसर्जन झाले. यावर्षी मुख्य मिरवणुकीत रंगारगल्ली पाठोपाठ चौंडेश्वरी मंडळ, साळीवाडा मंडळ, राजस्थान युवक मंडळ, चंद्रशेखर चौक मित्र मंडळ, नेहरु चौक मित्र मंडळ, माळीवाडा मित्र मंडळ व स्वामी विवेकानंद मित्र मंडळ अशा मानाच्या आठ गणपती मंडळांसह वाल्मीक मित्र मंडळ, भारत चौक मित्र मंडळ, बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, गणेशनगर मित्र मंडळ व तानाजी मित्र मंडळ असे एकुण चौदा मंडळे सहभागी झाली होती.

Ganeshotsav


मित्रप्रेम मंडळ-तेलीखुंट, श्री सत्कार समिती, शिवसेना शाखा क्र.11, ओंकार ग्रुप, साईनाथ मित्र मंडळ, फ्रेंडस सर्कल मंडळ, सावता माळी मित्र मंडळ, भारतीय जनता पक्षाच्या वतीने, संगमनेर शिवसेना ( शिंदे गट) व संगमनेर नगरपालिकेच्यावतीने मिरवणुकीतील सर्व गणरायांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुलालाचा वापर नगन्य दिसून आला तर जागोजागी फुलांच्या पाकळ्यांचा वापर झाला. दरवर्षी विसर्जनादरम्यान प्रवरा नदीपात्रात एखादी दुर्दैवी घटना घडते. यावर्षी मात्र एकही निष्पाप नागरीकाचा बळी जाणार नाही, यासाठी प्रशासनाने नेटके नियोजन केले होते. संगमनेरच्या प्रवरा पात्रानजीक पायरी घाट व गंगामाई घाट या दोनच ठिकाणी विसर्जनास परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणालाही नदीपात्रात उतरु दिले गेले नाही. त्यासाठी जयश्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एकविरा फौंडेशनचे स्वयंसेवक, श्री.ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी गणपती ताब्यात घेऊन साखळी पद्धतीने पात्रापर्यंत पोहोचवत होते. नदीपात्रात संगमनेर बजरंग दलाचे जवळपास 70 ते 80 कार्यकर्ते टायरट्युबद्वारा बनविलेल्या छोटीखानी तराफ्यावरुन ते सर्व गणपती मुख्य प्रवाहात नेवून मनोभावे विसर्जित करीत होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी एकही दुर्घटना घडली नाही.