Ganeshotsav : महापालिकेच्या गणेशोत्सव देखावे स्पर्धाचा निकाल जाहीर; २४ डिसेंबरला पारितोषिकांचे वितरण

Ganeshotsav : महापालिकेच्या गणेशोत्सव देखावे स्पर्धाचा निकाल जाहीर; २४ डिसेंबरला पारितोषिकांचे वितरण

0
Ganeshotsav : महापालिकेच्या गणेशोत्सव देखावे स्पर्धाचा निकाल जाहीर; २४ डिसेंबरला पारितोषिकांचे वितरण
Ganeshotsav : महापालिकेच्या गणेशोत्सव देखावे स्पर्धाचा निकाल जाहीर; २४ डिसेंबरला पारितोषिकांचे वितरण

Ganeshotsav : नगर : महापालिकामार्फत (AMC) घेण्यात आलेल्या गणेशोत्सव (Ganeshotsav) देखावे स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या मंगळवारी (ता. २४) रोजी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या हस्ते व आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

अवश्य वाचा : ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही – अजित पवार

पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील राजमाता जिजाऊ सभागृह येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंडे, संतोष टेंगले, प्रियंका शिंदे, मुख्य लेखा व वित्त आधिकारी सचिन धस, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, सहाय्यक संचालक नगररचना स्नेहल यादव, जल अभियंता परिमल निकम, सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, मेहेर लहारे, सपना वसावा, निखील फराटे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता मनोज पारखे आदींसह परीक्षण समिती अध्यक्ष तथा उपायुक्त प्रियंका प्रकाश शिंदे, प्रसिध्दी व सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजन, क्रीडा विभाग प्रमुख अमोल खोले, स्वप्नील मुनोत, अमोल बास्कर, अशोक डोळसे, मयूर मेहता, सर्व प्रभाग अधिकारी, प्रशासनधिकारी शिक्षण विभाग, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाने केले आहे.

नक्की वाचा : कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा ; खासदार नीलेश लंके यांची पियुष गोयल यांच्याकडे मागणी

गणेशोत्सव देखावे स्पर्धेचा निकाल २०२४ : (Ganeshotsav)

समाज प्रबोधनपर देखावे, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन, पाणी बचत आदी व इतर समाज प्रबोधनपर देखावे, व्यसनमुक्तीपर देखावे, प्लास्टिक मुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओ, जागतिक महामारीवर देखावे : प्रथम क्रमांक – तेलिखुंट तरुण मंडळ (नारी साक्षात अंबिकेचे रूप), द्वितीय क्रमांक (विभागून) – नवग्रह मित्र मंडळ (प्लास्टिकचा भस्मासूर) व छत्रपती शिवाजी आखाडा तरुण मंडळ (वासुदेवाची स्वारी), तृतीय क्रमांक (विभागून) – चौपाटी कारंजा मित्र मंडळ (संस्कार ही अपराध रोख सकता है.. सरकार नाही) व शिवगर्जना मित्र मंडळ (रोबोट)

ऐतिहासिक देखावे : प्रथम क्रमांक – शिववरद प्रतिष्ठान (पावन खिंड), द्वितीय क्रमांक (विभागून) – डाळमंडई तरुण मंडळ (शिवरायांचे गोरक्षण) व जनजागृती मित्र मंडळ (भक्ती शक्ती), तृतीय क्रमांक – जय आनंद महावीर युवक मंडळ (शिवराज्य अभिषेक सोहळा)

धार्मिक व अध्यात्मिक देखावे : प्रथम क्रमांक – नेताजी सुभाष तरुण मंडळ (द्रोणागीरी पर्वत – संजीवनी बुटी), द्वितीय क्रमांक (विभागून) – श्री महा‌वीर प्रतिष्ठान (मार्कंडेय मुनींची कथा) व राजयोग प्रतिष्ठान (योग योगेश्वर शंकर महाराज), तृतीय क्रमांक (विभागून) – आदर्श युवक मंडळ (चांगदेव महाराजांचे गर्वहरण) व नंदनवन मित्र मंडळ (सण नागपंचमीचा)

जिवंत देखावे, सोशल मिडीया व आधुनिक तंत्रज्ञान : प्रथम क्रमांक – सिद्धेश्वर तरुण मंडळ (अफजल खानाचा वध), द्वितीय क्रमांक (विभागून) – जयहिंद तरुण मंडळ (अंधरुन पाहून पाय पसरावे) व सुभाषचंद मित्र मंडळ (व्यसन एक विनाश), तृत्तीय क्रमांक (विभागून) – दोस्ती तरुण मंडळ मंडळ (वेड सेल्फीचं) व संगम तरुण मंडळ (बाप लेक)

गणेश विसर्जन मिरवणुकीत मराठमोळी संस्कृतीची जपवणूक, समाज प्रबोधनपर, शिस्तबध्द व पारंपारिक पध्दतीने मिरवणूक : प्रथम क्रमांक – श्री विशाल गणपती ट्रस्ट, माळीवाडा, द्वितीय क्रमांक – तालयोगी प्रतिष्ठान, सावेडी.

विशेष पारितोषिके : रंगसंस्कृती (रांगोळी ग्रुप), सम्राट तरुण मंडळ (भराडगल्ली)