Ganeshotsav : गणेशोत्सवात व मिरवणुकीवेळी धोकादायक इमारतींखाली उभे राहू नये : आयुक्त यशवंत डांगे

Ganeshotsav : गणेशोत्सवात व मिरवणुकीवेळी धोकादायक इमारतींखाली उभे राहू नये : आयुक्त यशवंत डांगे

0
Ganeshotsav : गणेशोत्सवात व मिरवणुकीवेळी धोकादायक इमारतींखाली उभे राहू नये : आयुक्त यशवंत डांगे
Ganeshotsav : गणेशोत्सवात व मिरवणुकीवेळी धोकादायक इमारतींखाली उभे राहू नये : आयुक्त यशवंत डांगे

Ganeshotsav : नगर : महापालिका प्रशासनाने (AMC) शहरातील १५ अतिधोकादायक अवस्थेतील इमारती (Dangerous Building) निश्चित केल्या आहेत. यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे. या इमारती उतरवून घेण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार काही इमारती व काही इमारतींचा धोकादायक भाग उतरवून घेण्यात आला आहे. काही इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्या काढता आलेल्या नाहीत. अशा इमारतींवर महापालिकेकडून सूचना फलक लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवात (Ganeshotsav) व मिरवणुकीवेळी या इमारतींजवळ किंवा इमारतींखाली थांबू नये, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनी केले आहे.

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

शहरातील १९७ इमारतींना नोटिसा

धोकादायक अवस्थेत असलेल्या शहरातील १९७ इमारतींना नोटिसा यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. तसेच, १५ इमारती अती धोकादायक अवस्थेत आहेत. या धोकादायक इमारतींवर कारवाई करून सर्जेपुरा व महाजन गल्ली येथील धोकादायक इमारत उतरवण्यात आली आहे. इतरही काही इमारती व इमारतींचे धोकादायक भाग उतरवून घेण्यात आले आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही धोकादायक इमारतींवर कारवाई झालेली नाही.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

धोकादायक इमारतींच्या परिसरात थांबण्यास मनाई (Ganeshotsav)

गणेशोत्सव काळात व विसर्जन मिरवणुकीवेळी अशा इमारतींच्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी दुर्घटना घडू नये, या इमारतींच्या परिसरात कोणीही थांबू नये, यासाठी या इमारतींवर महापालिकेकडून सूचना फलक लावण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here