Ganeshotsav : नगर : अहिल्यानगर शहरात गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि मंडळ परिसर गर्दीने फुललेले दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मदत व्हावी आणि कायदा सुव्यवस्था (Law and Order) सुरळीत राहावी, यासाठी कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) आणि स्नेहालय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘पोलीस मित्र’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
नक्की वाचा : जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल;काय होणार स्वस्त तर काय होणार महाग ?
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सहाय्य करणार
हे कार्यकर्ते गर्दीत हरवलेली मुले शोधणे, महिलांना मदत करणे, वृद्ध व दिव्यांग नागरिकांना सुरक्षित मार्गदर्शन करणे, हरवलेल्या वस्तू शोधून देणे, तसेच अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सहाय्य करणार आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्नेहालयाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना कायदेशीर माहिती दिली. कायद्याचे पालन करत नागरिकांना मदत करताना कोणती काळजी घ्यायची, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
अवश्य वाचा : सोन्याच्या दागिने जास्त चमकवून देतो म्हणत महिलेची फसवणूक; पाच तोळे लांबवीले
स्नेहालय संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, (Ganeshotsav)
सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन यांचा एकत्रित सहभाग समाजातील सुरक्षितता आणि जबाबदारीची भावना अधिक बळकट करतो. तरुणांनी सेवाभावातून केलेले हे कार्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. “गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी थेट सेवा देण्याची संधी मिळते,” असे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सांगितले.
या प्रसंगी कोतवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक निरीक्षक तेजश्री थोरात, हवालदार देवेंद्र पंढरकर, स्नेहालय संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, पीआरओ संगीता सानप, रेडिओ नगरचे संदीप शिरसागर, विद्या घोरपडे, विकास सुतार, सागर भिंगारदिवे, उषा खुल्लम, मनोज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी गणेशोत्सव आनंदाने आणि सुरक्षिततेने साजरा करताना पोलीस प्रशासन आणि पोलीस मित्रांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.