Ganeshotsav : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप

Ganeshotsav : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप

0
Ganeshotsav : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप
Ganeshotsav : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप

Ganeshotsav : कर्जत : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम सुरू असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळ मोठी तयारी करीत आहे. मात्र, कर्जत शहरातील रविशंकर विद्यामंदीराने (Ravi Shankar Vidyalay) बाहेरील डामडौल यांना फाटा देत शाळेच्या विद्यार्थ्यांचेच ढोल-ताशा पथक (Dhol Tasha Pathak) यासह लेझीम, झांज आणि टिपरी पथक सोबतीला घेत शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने लाडक्या गणरायास “पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात निरोप दिला.

नक्की वाचा :मराठा आरक्षणासाठीच्या नवीन जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळणार?

पारंपरिक पद्धतीने निरोप

विद्यार्थ्यांची ही आगळी-वेगळी विसर्जन मिरवणूक परिसरात सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली.सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू असून ठिकठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लाडक्या गणरायास भक्तिभावाने निरोप देण्यासाठी गणेश मंडळांनी कंबर कसली आहे. कुठे डीजे, तर बँडबाजा या गाजवाजात मोठी रक्कम खर्चली जात असताना कर्जत शहरातील रविशंकर विद्यामंदीराने मात्र यास फाटा देत शाळेतील विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा पथक, लेझीम, झांज, टिपरी एखादया व्यावसायिक पथकास लाजवेल असे सर्व पथके सोबत घेत पारंपरिक पद्धतीने निरोप दिला.

Ganeshotsav : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप
Ganeshotsav : रविशंकर विद्यालयाने पारंपरिक पद्धतीने दिला गणरायाला निरोप

अवश्य वाचा : ओबीसी समाजासाठी उपसमिती नियुक्त; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

गणेश विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी (Ganeshotsav)

विशेष म्हणजे पुणे-मुंबई या महानगरात जसे महिला पुरुष ढोल-ताशा पथकात सहभागी असतात, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थीनीनी ढोल बजावत सर्वांचे लक्ष वेधले. यासह लहान मुलांचे भजनी मंडळ देखील लयबद्ध तालीत भक्तीरसात न्हाऊन शहरातून निघालेली रविशंकर विद्यामंदिराची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा लक्षवेधी ठरली. तब्बल पाच तास या सर्व विद्यार्थ्यांनी आपली मिरवणूक शहरातील सर्वच भागातून नेत शेवटी नागेश्वर मंदिरातील बारवेत श्री चे विसर्जन करीत पुढच्या वर्षी लवकर या भावनेने भक्तीपूर्ण आणि जल्लोषात निरोप दिला.