Ganeshotsav:चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी!गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार

0
Ganeshotsav:चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी!गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार
Ganeshotsav:चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी!गणपतीला कोकणात समुद्रमार्गे जाता येणार

नगर : गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण गणेशत्सावासाठी (Ganeshotsav) गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा (Servants) प्रवास आणखी सोपा होणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत आपल्या गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्र मार्गे प्रवास (Travel by sea) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे.

नक्की वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या परदेश मिशनसाठी शिष्टमंडळ आज रवाना होणार; हे ‘५’ संदेश देणार 

माझगावपासून  रत्नागिरीपर्यंत जल वाहतूक सेवा सुरू (Ganeshotsav)

मुंबईतील माझगावपासून मालवण,विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार,अशी मोठी घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांची दरवर्षी प्रवासासंदर्भातील त्रासापासून काही अंशी सुटका होणार आहे.

अवश्य वाचा : राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार;चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती 

२५ मे पासून एम टू एम बोट मुंबईत दाखल  (Ganeshotsav)

गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवास हा त्रास नेहमी जाणवतो.आता या त्रासातून त्यांना दिलासा मिळणार  आहे. याकरिता एम टू एम बोट वापरली जाणार आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.