Gang Arrested : डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणारी टोळी जेरबंद

Gang Arrested : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे प्रवाशांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आले होते. या प्रकरणातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले.

0
Gang Arrested : डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणारी टोळी जेरबंद
Gang Arrested : डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणारी टोळी जेरबंद

Gang Arrested : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे प्रवाशांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटण्यात आले होते. या प्रकरणातील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. (Gang Arrested) महेश भालचंद्र मोरे (वय २५), अजय माणिक घेंगडे (वय १९, दोन्ही रा. राजापूर माठ, ता. श्रीगोंदा) व राहुल प्रभू गव्हाणे (वय २०, रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा) असे जेरबंद आरोपींचे (accused) नाव आहे.

हे देखील वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे

लोणी व्यंकनाथ येथे नितीन अडागळे व त्यांचे मित्र एका चारचाकी वाहनातून जात होते. त्यांच्या वाहनाला चार आरोपींनी दुचाकीवर येऊन अडविले. नितीन अडागळे व त्यांच्या मित्राच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून आरोपींनी कोयत्याचा धाक दाखविला. अडागळे व त्यांच्या मित्राकडील एक लाख १६ हजार रुपये व दोन मोबाईल आरोपींनी लंपास केले. या प्रकरणी अडागळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.

नक्की वाचा : इंदुरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाला दोन जणांवर संशय आला. त्यानुसार पथकाने महेश मोरे व अजय घेंगडे याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांचे साथीदार पथकाने जेरबंद केले. पथकाने आरोपींच्या अंगझडतीत चोरीच्या गुन्ह्यातील २५ हजार रुपये हस्तगत केले. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here