Gangadhar Shastri Gune Ayurved College : गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी केली शेकडो वारकऱ्यांची आरोग्यसेवा

Gangadhar Shastri Gune Ayurved College : गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी केली शेकडो वारकऱ्यांची आरोग्यसेवा

0
Burglary : प्राध्यापकाचे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास
Burglary : प्राध्यापकाचे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

Gangadhar Shastri Gune Ayurved College : नगर : पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या विविध छोट्या मोठ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांवर औषधोपचार करून आरोग्यसेवा (Healthcare) करण्याचा उपक्रम गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील (Gangadhar Shastri Gune Ayurved College) प्रशिक्षित डॉक्टर (Doctor) विद्यार्थ्यांनी केली.

नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया 

शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

यासाठी सोलापूर रोडवरील दहिगाव साकत, बनपिंपरी येथे विशेष बूथ लाऊन शेकडो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.

अवश्य वाचा :  ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे

विविध आजारांवर औषधोपचार (Gangadhar Shastri Gune Ayurved College)

आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप व महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य दत्तात्रय लोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य ए. पी. जगदाळे, ए. एच. शिंगारे, एन. सी. जाधव, व्ही. के. वाघ, जी. व्ही. लोखंडे, एस. बी. कदम, व्ही. पी. पवार, एस. आर. मुद्गल, समीर होळकर, ए. टी. देशमुख, ए. ए. देशमुख, नीलकंठ ठाकरे, टी. एस. वानखेडे व वैद्य रूपाली म्हसे यांच्यासह तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात वारकऱ्यांच्या पायावर तीळ तेलाचे स्नेहन करणे तसेच विविध आजारांवर औषधोपचार करण्याची सेवा सहभागींनी दिली.