Ganpati : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा केवळ २२१ गावातच एक गाव एक गणपती; संख्या लागली घटू

Ganpati : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा केवळ २२१ गावातच एक गाव एक गणपती; संख्या लागली घटू

0
Ganpati : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा केवळ २२१ गावातच एक गाव एक गणपती; संख्या लागली घटू
Ganpati : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा केवळ २२१ गावातच एक गाव एक गणपती; संख्या लागली घटू

Ganpati : नगर : ‘एक गाव एक गणपती’ (Ek Gaon Ek Ganpati) संकल्पनेतून यंदा जिल्ह्यातील २२१ गावांत उपक्रम राबवत सामाजिक (Social) एकोप्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान, सन २०२२ मध्ये ३२३ व (सन २०२३) २८० गावांत हा उपक्रम राबविण्यात आला होता. तर २०२४ मध्ये २६१ गाववात एका गाव एका गणपती (Ganpati) बसविण्यात आले होते. यंदा मात्र, यामध्ये घट झाली आहे.

नक्की वाचा: साईनगर, निजामाबाद गाड्यांना थांबा; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

काही वर्षांपासून ही संकल्पना पडत आहे मागे

दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ५२ गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. त्याच बरोबरीने संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहर, तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. गणेशोत्सव काळात गावात गट-तट निर्माण होऊन वाद होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलीस ठाण्यामार्फत गावामध्ये बैठक घेऊन, या योजनेसंदर्भात प्रबोधन करण्यात येते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून ही संकल्पना मागे पडत असल्याने उपक्रम राबविणार्‍या गावांची संख्या कमी होत आहे.

अवश्य वाचा : हनी ट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश; तीन महिलांवर गुन्हा दाखल

या गावांमध्ये राबवीली संकल्पना

अशा परिस्थितीतही यंदा अकोले तालुक्यातील अकोले, राजूर ५२ व संगमनेर तालुक्यातील शहर, तालुका, घारगाव व आश्वी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २४ गावांनी हा उपक्रम राबवून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. पारनेर तालुक्यात पारनेर व सुपा पोलीस ठाणे हद्दीतील १७ गावात ही संकल्पना राबवण्यात आली. नेवासा व कर्जत तालुक्यात प्रत्येकी १० गावातच ही संकल्पना राबवण्यात आली. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात या संकल्पनेला प्रतिसाद मिळत नाही. त्या तुलनेत एक हजार, दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांत ही संकल्पना वाढीस येत आहे.

मात्र मंडळांच्या संख्येत झाली वाढ (Ganpati)

जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळे व कार्यकर्त्यांनी उत्साहात गणरायांचे स्वागत केले. मात्र, ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेचा प्रतिसाद कमी झाल्याचे चित्र आहे. तर, मंडळांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ हजार ११९ लहान-मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली. येत्या काळात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातून आखाडे बांधले जात आहे. त्यामुळेच मंडळांची संख्या वाढून ‘एक गाव एक गणपती’ संकल्पेचा प्रतिसाद कमी झाल्याचे चित्र आहे.
पोलीस ठाणेनिहाय गावेपारनेर ९, सुपा ८, नगर तालुका १६, कर्जत २, जामखेड २०, श्रीगोंदे ५, बेलवंडी ९, मिरजगाव १, शेवगाव १०, पाथर्डी ६, नेवासा ८, शनिशिंगणापूर १, श्रीरामपूर शहर २, श्रीरामपूर तालुका १, शिर्डी १, राहुरी ९, संगमनेर शहर ४, संगमनेर तालुका १९, राजूर ५२, घारगाव १२, आश्वी १, राहाता ३, लोणी ३, कोपरगाव तालुका १७, कोपरगाव शहर १, एकूण २२१