Karmayogi Abasaheb:’कर्मयोगी आबासाहेब’मधून उलगडणार गणपतराव देशमुखांचा प्रवास  

0
Karmayogi Abasaheb:'कर्मयोगी आबासाहेब'मधून उलगडणार गणपतराव देशमुखांचा प्रवास  
Karmayogi Abasaheb:'कर्मयोगी आबासाहेब'मधून उलगडणार गणपतराव देशमुखांचा प्रवास  

karmyogi Abasaheb : वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षं त्यांनी या मतदारसंघाचं आपले प्रतिनिधित्वं केलं. स्वर्गीय गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य आता चित्रपटातून उलगडणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला “कर्मयोगी आबासाहेब” हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत जगभर रिलीज होत आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लाँच(Poster launch) करण्यात आलं आहे.

नक्की वाचा : दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

अनिकेत विश्वासराव मुख्य भूमिकेत झळकणार (Karmayogi Abasaheb)

मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. गायक अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटात अनिकेत विश्वासराव हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे, अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.

अवश्य वाचा : पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

२५ ऑक्टोबरला येणार चित्रपट (Karmayogi Abasaheb)

आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तब्बल अकरा वेळा ते आमदार झाले. त्यात दोन वेळा कॅबिनेट मंत्रीपद भुषवण्याची संधी त्यांना मिळाली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या, आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध चित्रपटातून घेण्यात आला आहे. त्यामुळे आबासाहेबांना चित्रपटातून पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता २५ ऑक्टोबरपर्यंत सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here