Gas shortage : अकोलेत काँग्रेस पक्षाचे गॅस टंचाईबाबत तहसीलदारांना निवेदन

गॅस सिलेंडर घेण्यासाठी भल्या पहाटेपासून मोठ्या रांगा

0

Gas shortage : अकोले: केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात अचानकपणे वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. त्यातच सिलेंडर घेण्यासाठी अकोलेत पहाटेपासूनच रांगा लागत आहे. सर्वत्र गॅस टंचाई (Gas shortage) जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन (Statement to the Tehsildar) देत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने आजपर्यंत किमान ५० वेळा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केलेली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चारशे रुपये असलेला गॅस सिलेंडर आता साडेनऊशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

अवश्य वाचा- अहिल्यानगर महापालिकेकडून भाड्याच्या उत्पन्नावर कर आकारणी; क्षेत्रफळानुसार आकारणी करण्याची शिवसेनेची मागणी

गॅस सिलेंडर घेण्यासाठी भल्या पहाटेपासून मोठ्या रांगा (Gas shortage)

त्याचबरोबर व्यावसायिक वापराचा एलपीजी सिलेंडर महाग होऊन १९०० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय सुद्धा बंद पडून अनेक कुटुंबांना आपला उदरनिर्वाह करणे अवघड होत आहे. घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी भल्या पहाटेपासून मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील गॅस डिस्ट्रीब्यूटर यांची एक बैठक तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी बोलावून सिलेंडर वितरणासंबंधी त्यांना काही नियम घालून द्यावेत, ज्यायोगे नागरिकांना घरगुती वापराचा सिलेंडर मिळू शकेल. त्याचबरोबर व्यवसायिकांनाही एलपीजी सिलेंडर मिळाले पाहिजे यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी काँग्रेसपक्षाच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे.