Gashmir Mahajani:अभिनेता गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या भूमिकेत दिसणार 

0
Gashmir Mahajani:अभिनेता गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत
Gashmir Mahajani:अभिनेता गश्मीर महाजनी व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेत

Gashmir Mahajani : छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते. त्यातील एक म्हणजे सकल शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री (Venkatadhwari Narasimha Shastri). हेच व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री आपल्याला फुलवंती चित्रपटात (Fulwanti Movie) पाहायला मिळणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी याने ही भूमिका साकारली आहे. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर या व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.

नक्की वाचा : ‘मानवत मर्डर्स’चा टीझर आऊट,महाराष्ट्र हादरवणाऱ्या हत्याकांडावर आधारित वेब सीरीज

‘फुलवंती’ चित्रपट ११ ॲाक्टोबरला प्रदर्शित होणार (Gashmir Mahajani)

पेशव्यांच्या दरबारात व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात आपल्यासमोर ११ ॲाक्टोबरला भेटायला येणार आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा गश्मीर महाजनी साकारत आहेत. सोबत ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत चतुरस्त्र अभिनेत्री प्राजक्ता माळी पहायला मिळणार आहे. व्यंकट शास्त्री यांचे व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता आणि चारही दिशांना पसरलेली त्यांची किर्ती हे सर्व आपल्याला या ऐतिहासिकपटातून पहायला मिळणार आहे. 

अवश्य वाचा : मराठमोळ्या सचिन खिलारीने पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास,४० वर्षांनंतर भारताला मिळवून दिले पदक

अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या भूमिकेत  (Gashmir Mahajani)

अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी चित्रपटांसह, हिंदी मालिका व रिअॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता गश्मीर महाजनी ‘फुलवंती’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल तितकाच उत्सुक आहे. पेशवाई काळातील ‘फुलवंती’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांची ही दमदार कथा आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने वेगळ्या धाटणीच्या भूमिका करत असल्याचा आनंद गश्मीरने व्यक्त केला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे.

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘फुलवंती’ हा चित्रपट मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here