Gauri Ganapati : येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना

Gauri Ganapati : येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना

0
Gauri Ganapati : येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना
Gauri Ganapati : येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना

Gauri Ganapati : नगर : नगर जिल्ह्यातीलच जामखेड (Jamkhed) तालुक्यातील सातेफळ येथील एका मुस्लिम कुटुंबांने गौराईची स्थापना (Gauri Ganapati) केली जाते. त्यांच्या गेल्या दोन पिढ्यापासूनची ही परंपरा जोपासली जात आहे. त्यांची ही परंपरा धार्मिक ऐक्याची (Religious Unity) ओळख बनली आहे.

नक्की वाचा: बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

शेतात काम करताना सापडल्या होत्या लक्ष्मी मूर्ती

मूळचे धाराशिव येथील असेलेले रशीद दगडू सय्यद यांचे कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी सातेफळ येथील खैरी मध्यम प्रकल्प कामानिमित्त स्थलांतरित झाले होते. गौराई स्थापनेच्या परंपरेबाबत सांगताना त्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी सय्यद यांचे वडील दगडू नन्हु सय्यद यांना शेतात काम करत असताना लक्ष्मीच्या दोन मूर्ती सापडल्या होत्या. या मुर्त्या चार दिवस त्यांच्या शेतातच होत्या. त्यांनतर त्यांनी त्या लक्ष्मीच्या मूर्ती घरी आणल्या.

अवश्य वाचा: आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका

३९ वर्षापासून गणेशोत्सव काळात गौरी स्थापना (Gauri Ganapati)

या मुर्त्यांचे काय करायचे याविषीयी त्यांनी गावातील मंदिरातील पुजारी, मौलाना, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून सल्ला घेतला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की तुम्ही मोठे नशीबवान आहात, ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीच्या मूर्ती सांपडला आहेत. या मुर्त्यांची गौरी गणपती सणाच्या दिवशी स्थापना करीत जा. त्यामुळेच रशीद दगडू सय्यद यांचे कुटुंब मागील ३९ वर्षापासून गणेशोत्सव काळात गौरीची स्थापना करत आहेत.

जामखेडमधील सय्यद कुटुंब हे गौराईची स्थापना गेल्या दोन पिढ्यांपासून करत आहे. त्यांचे सर्व कुटुंबीय या सणानिमित्त मनोभावे पूजा करतात. तसेच तीन दिवस उत्साहात सण साजरा करतात.