Gautami Patil Car Accident:पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाची जोरदार धडक; रिक्षाचे झाले दोन तुकडे  

0
Gautami Patil Car Accident:पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाची जोरदार धडक; रिक्षाचे झाले दोन तुकडे  
Gautami Patil Car Accident:पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाची जोरदार धडक; रिक्षाचे झाले दोन तुकडे  

नगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वाहनाचा पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील हा अपघात (Vehicle Accident) झाला.अपघातांसाठी चर्चेत असलेल्या नवले इथल्या वडगाव पुलाजवळ (Vadgaon Bridge) हा अपघात झाला आहे. एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनाने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासोबतच दोन प्रवासी जखमी (Two passengers Injured) झाले असून रिक्षाचे यामध्ये मोठं नुकसान झाले आहे.

नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेसाठी नवा नियम;पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

गौतमीचा वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात (Gautami Patil Car Accident)

पुण्यातील मुंबई-बंगळुरु वडगाव इथल्या एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या रिक्षाला गौतमीच्या गाडीची धडक लागली. यावेळी रिक्षात दोन प्रवासी प्रवास करत होते. ही धडक इतकी जोरात लागली की, रिक्षातील दोन प्रवासी आणि रिक्षाचालक जखमी झालेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या अपघातानंतर सिंहगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गौतमीच्या चालकाकडून हा अपघात झाला असून त्यावेळी या वाहनामध्ये कोणीही नव्हते. पोलिसांनी गौतमीच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे.  

अवश्य वाचा: नवरात्रीत भोंडला का खेळतात ? जाणून घ्या सविस्तर…

अपघात नेमका कसा झाला? (Gautami Patil Car Accident)

वडगाव इथल्या गौतमी पाटीलच्या वाहनाच्या धडकेत रिक्षाचं नुकसान झालं आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील त्या गाडीमध्ये नव्हती. गौतमीच्या चालकाकडून हा अपघात झाला असून त्यावेळी गाडीमध्ये कोणी नव्हतं. गौतमीच्या चालकानं मद्य प्राशन केलं होतं की, नाही याचा तपास पोलिस करत आहे. सध्या पोलिसांनी गौतमीच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.