Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’चं पहिले पोस्टर प्रदर्शित

गौतमी पाटीलच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता आऊट झालं आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज होणार आहे.

0
गौतमी पाटीलच्या 'घुंगरु' चं पहिले पोस्टर प्रदर्शित

नगर : आपल्या नृत्यातील अदाकारीने तरुणाईला वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतमीच्या आगामी ‘घुंगरु’ (Ghungroo) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता आऊट झालं आहे. आज या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज होणार आहे. या सोहळ्यादरम्यान गौतमी उपस्थित राहणार नसून निर्माते बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांचे हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : आजपासून एलपीजी गॅस महागला !

सोशल मीडिया स्टार असलेली गौतमी पाटील यावेळी तिच्या नृत्यामुळे चर्चेत न येता आगामी सिनेमामुळे चर्चेत आली आहे. गौतमीच्या पहिल्यावहिल्या ‘घुंगरु’ या सिनेमाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता ‘घुंगरु’ या सिनेमात गौतमीने एका लावणी कलावंताची भूमिका साकारली आहे.या सिनेमात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्य अशा सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा : ‘डान्स प्लस’ चा सातवा सीजन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा लिहिली आहे. तसेच तेच या सिनेमाचे निर्माते आहेत. ‘घुंगरु’ या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोलापूर, माढा आणि हंपीसह परदेशात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. गौतमीचा  ‘घुंगरु’ हा मराठी सिनेमा १५ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here