Gavathi Katta : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

Gavathi Katta : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

0
Gavathi Katta : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
Gavathi Katta : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

Gavathi Katta : नगर : गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणारे दोन सराईत गुन्हेगार (Criminal) अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर ते अमरधाम परिसरातून कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे असा एकूण १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अनिल लक्ष्मण गायकवाड (वय ३९ रा. गांधीनगर बोल्हेगाव अहिल्यानगर), ओमरत्न फुलकेश भिंगारदिवे ( रा. नालेगाव, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन

खात्रीशीर माहितीनूसार कारवाई

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुर्वेद -अमरधाम रस्त्यावर एक संशयित व्यक्ती गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काढत असे एकूण १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गावठी पिस्टल ओमरत्न भिंगारदिवे यांच्याकडून घेतला असल्याचे तपासात समोर आले. त्यालाही कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन

यांच्या पथकाने केली कारवाई (Gavathi Katta)

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश देशमुख, पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, विनोद बोरगे, वसीम पठाण, साबीर शेख, अविनाश वाकचौरे, विजय ठोंबरे, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, सुरज कदम, अभय कदम, अमोल गाडे, रिंकू काजळे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, सचिन लोळगे, राम हंडाळ, राहुल मासाळकर, संकेत धीवर, अतुल लाटे, अतुल शेंडे यांच्या पथकाने केली आहे.