Gavathi Katta : नगर : पुणे (Pune) येथील कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गावठी कट्टासह (Gavathi Katta) खुनाचा कट रचल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे. ओंकार दयानंद पवार (वय २४, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
आरोपी अहिल्यानगर परिसरात आल्याची माहिती
पुणे शहरातील खंडणी विरोधी पथक-०२, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यात गावठी कट्टा सह खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी ओंकार पवार हा अहिल्यानगर परिसरात आल्याची माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले होते. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ही बाब पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
पुणे शहर गुन्हे शाखेच्या दिले ताब्यात (Gavathi Katta)
दरम्यान, पोलीस पथक एमआयडीसी परिसरात शोधमोहीम राबवत असताना पेट्रोल पंप परिसरात एक संशयित व्यक्ती फिरताना दिसून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ओंकार दयानंद पवार (वय २४, रा. गुलटेकडी, पुणे) असे सांगितले.
त्यानंतर सखोल चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. आरोपीस पुढील कारवाईसाठी पुणे शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.



