Gavathi Katte : गावठी कट्टे विक्री करणारे दोघे जेरबंद

Gavathi Katte : गावठी कट्टे विक्री करणारे दोघे जेरबंद

0
Gavathi Katte

Gavathi Katte : नगर : नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात गावठी कट्टे (Gavathi Katte) विक्री करणारे दोघे जण स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. किशोर तुकाराम माळी (वय ३०, रा. लोहारवाडी, ता. नेवासा) व कृष्णा येलप्पा फुलमाळी (वय ३३, रा. घोडेगाव, ता. नेवासा) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. जेरबंद आरोपींकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

हे देखील वाचा: नगरमधील साडेबारा एकर भूखंडाला आणखी वेगळे वळण

अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांच्या धडक मोहीम (Gavathi Katte)


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, किशोर माळी व कृष्णा फुलमाळी (दोघे रा. घोडेगाव, ता. नेवासा) हे दोघे गावठी कट्टे विक्रीसाठी घोडेगाव ते लोहगाव रस्त्यावरील घोडेश्वरी शाळेच्या पाठीमागे येणार आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना जेरबंद केले. मात्र, त्यांचे साथीदार आकाश अनिल फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासा) व गणेश साबळे (रा. सोनई, ता. नेवासा) हे पसार झाले आहेत.

नक्की वाचा: मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका

दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे हस्तगत (Gavathi Katte)

जेरबंद आरोपींकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे असा ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकाने जेरबंद आरोपींविरोधात अवैध शस्त्रे बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोन्ही जेरबंद आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी कृष्णा फुलमाळीवर गंभीर स्वरुपाचे ९ तर किशोर माळीवर तीन गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here