Geetanjali Shelke : नगर : नुकत्याच महानगर सहकारी बँकेच्या (G S Mahanagar Co-op Bank) निवडणुकीमध्ये बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके (Geetanjali Shelke) यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने भरगोस यश मिळाल्याने व महानगर बँकेच्या चेअरमन पदी गीतांजली शेळके यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे (Madhavrao Kanwade) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद
जिल्हा बँकेचे स्वर्गवासी उदय शेळके यांचे मोलाचे योगदान
सहकारी चळवळीमध्ये ग्रामीण भागाचा विकास होत असताना शहरी भागातही बँकिंग सेवा सहकारी संस्थामार्फत देण्यासाठी महाराष्ट्रात अर्बन बँका स्थापन झाल्या महाराष्ट्रातील अर्बन बँकांमधील महानगर सहकारी बँक मुंबई ने बँकिंग क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट काम केले असून भक्कमपणे उभी आहे यात स्वर्गवासी सॉलिसिटर गुलाबराव शेळके व जिल्हा बँकेचे तत्कालीन चेअरमन स्वर्गवासी उदय शेळके यांचे मोलाचे योगदान असल्याची प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हॉइस चेअरमन ॲड. माधवराव कानवडे यांनी केली.
अवश्य वाचा : ‘त्या’ बोगस कारभाराची एसआयटी चौकशी करा; आमदार संग्राम जगताप यांची विधिमंडळात मागणी
पदाधिकारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती (Geetanjali Shelke)
याप्रसंगी माजी मंत्री बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, अमित भांगरे,गणपतराव सांगळे, मधुकरराव नवले, सुरेश तथा बाळासाहेब साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, बँकेचे जनरल मॅनेजर, मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.