Gela Madhav Kunikade:’गेला माधव कुणीकडे’ नाटक १५ जूनला पुन्हा रंगमंचावर

प्रशांत दामले आणि विनय येडेकर या दोघांच्या अफलातून केमिस्ट्रीवर पब्लिक चांगलीच फिदा झाली होती. या नाटकातील 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलाॅग आजही चांगलाच पॉप्युलर आहे.

0
Gela Madhav Kunikade
Gela Madhav Kunikade

नगर : ‘गेला माधव कुणीकडे’ असं विचारणाऱ्या नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता आपला माधव पुन्हा रंगमंचावर परतणार आहे. ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले (Prashant Damle) आणि विनय येडेकर (Vinay Yedekar) ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले.

नक्की वाचा : सिद्धार्थ-तृप्तीचा ‘धडक-२”या’ दिवशी होणार प्रदर्शित

प्रशांत दामले आणि विनय येडेकर यांची अफलातून केमिस्ट्री (Gela Madhav Kunikade)

प्रशांत दामले आणि विनय येडेकर या दोघांच्या अफलातून केमिस्ट्रीवर पब्लिक चांगलीच फिदा झाली होती. या नाटकातील प्रशांत दामले यांचा ‘अरे हाय काय अन् नाय काय’ हा डायलाॅग आजही चांगलाच पॉप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ‘ब्रेक’ घेतला हॉटेल. मात्र रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी चार वाजता होणार आहे. या नाटकाच्या  तिकीट विक्रीचा शुभारंभ एक जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’ अॅप वर सुरु  होईल.

अवश्य वाचा :  पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळाचा दणका; एक लाख नागरिकांचे स्थलांतर 

प्रशांत दामले पुन्हा प्रेक्षकांना हसवणार  (Gela Madhav Kunikade)

रसिकांना हसवण्याचं आपलं कर्तव्य चोख बजावत रंगभूमी हीच कर्मभूमी मानत एकापेक्षा एक सरस नाटके देणाऱ्या प्रशांत दामले यांनी पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणत रसिकांना मनोरंजनाची अफलातून ट्रीट दिली आहे. काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक त्यापैकीच एक.  मायबाप रसिकांसाठी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत असल्याचे अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले.  

वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाची संहिता च धमाकेदार होती. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करायचे त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो, याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी असायची. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि  कलाकारांच्या भूमिका यामध्ये आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here