Gelatin explosion | विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू

0
Gelatin explosion | विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू
Gelatin explosion | विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू

Gelatin explosion | श्रीगोंदा : टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा) येथे विहिरीच्या खोदकामासाठी लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा अचानक स्पोट (Gelatin explosion) झाला. त्यामुळे विहिरीत असलेल्या चार कामगारांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

नक्की वाचा : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

तिघांचा मृत्यू (Gelatin explosion)

नागनाथ भालचंद्र गावडे (वय २९, ता. बारडगाव सुद्रिक, ता. कर्जत), सुरज युसुफ इनामदार (वय २७), गणेश नामदेव वाळुंज (वय २९, दोघे रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) अशी मृतांची नावे आहेत. तर जब्बार सुलेमान इनामदार (वय ४५), वामन गेनाजी रणसिंग (वय ६५), रवींद्र गणपत खामकर (वय ५५, तिघे रा. टाकळी कडेवळीत ता. श्रीगोंदा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अवश्य वाचा : ‘नेत्याला पक्षात घेऊन संपवणं ही भाजपची परंपरा’- विजय वडेट्टीवार

तिघे जखमी (Gelatin explosion)

या बाबत मिळालेली माहिती अशी, टाकळी कडेवळीत येथील वामन गेणाजी रणसिंग यांच्या विहिरीचे काम सुरू होते. विहीर खोदण्यासाठी विहिरीत जिलेटिनच्या कांड्या लावण्यात आल्या होत्या. यावेळी विहिरीत काम करणारे चार जण जिलेटीनच्या कांड्या लावून विहिरीच्या बाहेर येण्याच्या आगोदरच जिलिटीन कांड्यांचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात विहिरीत काम करणारे नागनाथ गावडे, सुरज इनामदार, गणेश वाळुंज आणि जब्बार इनामदार हे चार जण विहिरीच्या बाहेर फेकले गेले. यात नागनाथ गावडे, सुरज इनामदार, गणेश वाळुंज या तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर जब्बार इनामदार तसेच विहिरीच्या जवळ असलेले विहिरीचे मालक वामन रणसिंग आणि विहिरीचे काम पाहण्यासाठी आलेले रणसिंग यांचे शेजारी रवींद्र खामकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here