Gelatin explosion : श्रीगोंदा तालुक्यातील विहीर कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत आरोपी गजाआड

Gelatin explosion : श्रीगोंदा तालुक्यातील विहीर कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत आरोपी गजाआड

0
Gelatin explosion : श्रीगोंदा तालुक्यातील विहीर कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत आरोपी गजाआड
Gelatin explosion : श्रीगोंदा तालुक्यातील विहीर कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत आरोपी गजाआड

Gelatin explosion : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका विहिरीचे काम सुरू होते. या विहीर कामाच्या वेळी झालेल्या जिलेटिन कांड्यांच्या स्फोटात (Gelatin explosion) तीन मजूर मृत्युमुखी (Death) पडले. तर तीन जण जखमी झाले होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मजुरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपात संजय श्यामराव इथापे (रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) याला जेरबंद केले.

नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

मृत्यू व गंभीर दुखापतीला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल

 टाकळी कडेवळीत येथे रविवारी (ता. १६) विहीर खोदकाम करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. सुरज युसूफ इनामदार, गणेश नामदेव वाळुंज (दोघे रा. टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा) व नागनाथ भागचंद्र गावडे (रा. बारडगाव, ता. कर्जत) यांचा मृतांत समावेश आहे. या प्रकरणी संजय इथापे विरोधात श्रीगोंदे पोलीस ठाण्यात मृत्यू व गंभीर दुखापतीला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल आहे. घटनेनंतर संजय इथापे हा पसार होता.

Gelatin explosion | विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू
Gelatin explosion | विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू

अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक

तांत्रिक माहितीच्या आधारे तपास (Gelatin explosion)

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पसार आरोपीला शोधण्यासाठी पथके रवाना केली होती. पथकाने संजय इथापे याच्या नातेवाईकांकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही माहिती पथकाला मिळाली नाही. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, आरोपी संजय हा पुणे जिल्ह्यातील हडपसर भागात आहे. त्यानुसार पथकाने हडपसर येथे जाऊन संजयचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here