Presvu Eye Drops:चष्म्यापासून मिळणार मुक्ती! नवीन ‘प्रेस्वू आयड्रॉप्स’ला केंद्राची मंजुरी  

0
Presvu Eye Drops
Presvu Eye Drops

Presvu Eye Drops : आता चष्मा वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता एक नवीन ‘आय ड्रॉप्स’ (Eye Drops) येत आहे, त्यामुळॆ १५ मिनिटांत तुमच्या दृष्टीत बदल होऊ शकतो. ड्रग रेग्युलेटर, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controler Genral Of India) भारतातील या पहिल्या ‘आय ड्रॉप्स’ला मान्यता दिली आहे. यामुळे तुम्हाला चष्माशिवाय वाचता आणि पाहता येणार आहे.  

नक्की वाचा : लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका;गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

मुंबईमधील एन्टोड फार्मास्युटिकल्सने बनवलेले ‘प्रेस्वू’ नावाचे ‘आय ड्रॉप्स’ (Presvu Eye Drops)

मुंबईमधील एन्टोड फार्मास्युटिकल्सने मंगळवारी (ता.३) पायलोकार्पिन वापरून बनवलेले ‘प्रेस्वू’ नावाचे ‘आय ड्रॉप्स’ बाजारात आणले. हे औषध डोळ्यातील ‘प्रिस्बायोपिया’वर उपचार करते.  प्रिस्बायोपिया  ही वय-संबंधित स्थिती आहे, यामध्ये जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची डोळ्यांची क्षमता कमी होते. या नव्या आयड्रॉपमुळे ‘प्रिस्बायोपिया’ या समस्येशी लढणाऱ्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या आयड्रॉपमुळे तुम्हाला चष्म्यापासून मुक्ती मिळू शकेल, असा त्यांचा विश्वास आहे.

अवश्य वाचा : ‘जो हिंदू हित की बात करेगा,वही देश पर राज करेगा’;’धर्मवीर-२’चा नवा ट्रेलर प्रदर्शित

विशेष म्हणजे भारताच्या औषध नियामक संस्थेने या आयड्रॉपसाठी मंजुरी दिली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापर्यंत आयड्रॉपची तपासणी पूर्ण केल्यानंतर आयड्रॉपला हिरवा कंदील देण्यात आला. या आयड्रॉपमध्ये पिलोकार्पाइन या औषधाचा वापर करण्यात आला आहे. नवीन दाखल झालेलं आयड्रॉप ‘ प्रिस्बायोपिया’ या समस्या कमी करण्यासाठी काम करतं आणि  परिणामी या समस्येने ग्रासलेल्या वयस्क व्यक्तींना मोठा आधार मिळू शकतो, असं कंपनीने सांगितलं.  

प्रिस्बायोपिया ही डोळ्यांची सामान्य समस्या आहे. जसं वय वाढतं त्यानुसार ही समस्या वाढते. यामध्ये डोळ्यांची क्षमता कमकुवत होते. त्याशिवाय आपल्याहून लांब असलेल्या गोष्टी स्पष्टपणे दिसण्यास अडथळा येतो. वयस्क लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसते. आपल्यापासून दूर असलेलं स्पष्ट न दिसणं, वाचायला त्रास होणं आणि डोळे सतत दुखणं हे प्रेस्बिओपिया समस्येची प्राथमिक लक्षणं आहेत.

एन्टोड फार्मास्यूटिकल्सचे सीईओ निखिल मसुरकर यांनी एका माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, या औषधाचा एक थेंब डोळ्यात  टाकल्यानंतर १५ मिनिटांत परिणाम दिसून येईल. याचा प्रभाव पुढील सहा तासांपर्यंत राहील. पहिला ड्रॉप टाकल्यानंतरच्या तीन तासात दुसरा ड्रॉप टाकला तर याचा प्रभाव अधिक कालावधीपर्यंत राहील. ते म्हणाले, आतापर्यंत डोळ्यांच्या समस्येसाठी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केला जात होता. काहीवेळा शस्त्रक्रियेच्या पर्यायांचा अवलंब केला जातो. मात्र त्यावर प्रेस्वू ड्रॉप्स फायदेशीर ठरेल.

ऑक्टोबरपासून मेडिकलमध्ये उपलब्ध होणार आय ड्रॉप (Presvu Eye Drops)

एन्टोड फार्मास्यूटिकल्स या कंपनीने आतापर्यंत आय, ईएनटी आणि त्वचेसंबंधित औषधं तयार केली आहेत. ही औषधं ६० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन वर या आयड्रॉप्स २५० रुपयांपर्यंत मेडिकलमध्ये उपलब्ध होतील. हे औषध ४० ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांसाठी सौम्य ते मध्यम प्रिस्बायोपियाच्या उपचारांत देता येईल. मसुरकर यांचा दावा आहे की, हे औषध भारतातील अशा प्रकारचं पहिलच औषध आहे. ज्याची चाचणी भारतीय डोळ्यांवर करण्यात आली आहे आणि भारतीय लोकसंख्येच्या अनुवांशिकतेला आधार धरून तयार करण्यात आली आहे. हे ड्रॉप भारतीयांना नक्कीच फायदेशीर ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here