Get together : नगर : पंचावन्न वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांच्या (Alumni) स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याचा क्षण एखाद्याच प्राध्यापकाच्या जीवनात क्वचितच येतो. तो क्षण माझ्या वाट्याला आला. त्यामुळे माझं मन समाधानाने, आनंदाने भरून पावले आहे, अशा भावना प्रा. प्रताप यांनी व्यक्त केल्या. प्रसंग होता १९६९-७० सालच्या शास्त्र विभागाच्या प्री डिग्री वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ५५ वर्षांनंतर झालेल्या स्नेहसंमेलनाचा (Get together), ५५ वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्याने या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अहमदनगर क्लब (Ahmednagar Club) येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास पुणे शहर व नगर जिल्ह्यातील ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हे देखील वाचा: नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वाहतुकीत बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग काेणते?
जुन्या काळातील आठवणींना उजाळा (Get together)
स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून रसायन शास्त्राचे तत्कालीन प्रा. प्रताप सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी पुणेरी पगडी देऊन प्रताप सरांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्या वेळचे अनुभव कथन करताना अनेक विद्यार्थ्याच्या भावना दाटून आल्या. यावेळी ७३ वर्षीय माजी विद्यार्थ्यी लेंडे यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर सर्वानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्व माजी विद्यार्थ्यानी अहमदनगर महाविद्यालयात जाऊन ५५ वर्षांपूर्वी ज्या वर्गात, ज्या बाकावर बसून शिक्षण घेतले होते त्या वर्गाला भेट दिली. तेथे बाळासाहेब पतंगे आणि जयश्री जगताप यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींकडून आराेग्य विकास प्रक्रियेशी जाेडण्याचे महत्त्वपूर्ण काम : राधाकृष्ण विखे पाटील
माजी विद्यार्थ्यांनी संयोजकांचे मानले आभार (Get together)
या स्नेह मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी संयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाची प्रस्तावना माजी नगरसेवक सतीश लांडगे यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले. ५५ वर्षांनी सर्व सवंगडी एकत्र केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राजेंद्र डांगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. बाळासाहेब पतंगे यांनी आभार मानले.