Ghar Ghar Samvidhan : नगर : भारताच्या संविधानाला (Indian Constitution) ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार पुढील वर्षभर अहिल्यानगर शहरात घर घर संविधान (Ghar Ghar Samvidhan) अभियान राबविण्यात येणार आहे. आज अहिल्यानगर महापालिकेत हर घर संविधान अभियानाच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक वाचन केले. तसेच येत्या वर्षभरात महापालिके मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात दिली.
नक्की वाचा : ‘खाशाबा’चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स
विविध उपक्रमांचे आयोजन (Ghar Ghar Samvidhan)
या अभियानांतर्गत येत्या वर्षभरात अहिल्यानगर महापालिका मार्फत शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे, शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका, उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे, शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे, भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे, कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे, संविधान मूल्ये यावर पथनाट्य तयार करणे, शाळा, महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे, संविधान दिन कार्यक्रम, संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन, प्रजासत्ताक दिनी संविधानातील मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही महापालिकेतर्फे कळविण्यात आले. या वेळी प्रशांत खांडकेकर, उपायुक्त विजयकुमार मुंडे, प्रियांका शिंदे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, अशोक साबळे, कामगार नेते अनंत लोखंडे व कर्मचारी उपस्थित होते.