नगर : मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनावर राज्य करणारी मराठमोठी अभिनेत्री गिरीजा ओक लवकरच एक नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच गिरीजा ओक ने जागतिक रंगभूमी दिनाचं (World Theater Day) औचित्य साधून नव्या नाटकाची घोषणा केली. ‘ठकीशी संवाद’ हे नाटक घेऊन गिरिजा ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकामध्ये गिरीजा ओक सोबत अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.
नक्की वाचा : शुभमनला ऋतुराज भरला भारी; चेन्नईचा गुजरातवर ६३ धावांनी विजय
गिरिजा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज (Girija Oak)
गिरिजाने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. रंगभूमी पासून तिने मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. आता पुन्हा ती एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. गिरीजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नाटकासंदर्भात पोस्ट केली आहे. “ठकीशी संवाद” या नाटकाचा 10 मे 2024 रोजी शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित “ठकीशी संवाद” नक्की काय असणार ने बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
अवश्य वाचा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली
‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘जवान’ चित्रपटांमध्ये गिरीजाची महत्त्वाची भूमिका (Girija Oak)
गिरीजा ओकने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘जवान’ चित्रपटांमध्ये गिरीजाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या आता जवान नंतर गिरिजा रंगभूमीवर बघायला मिळणार असून या नाटकात ती काय भूमिका साकारणार हे बघण उत्सुकतेच असणार आहे.