Girish Mahajan: मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढू – गिरीश महाजन

येत्या अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल. असे आश्वासन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे.

0
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढू - गिरीश महाजन
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीतून मार्ग काढू - गिरीश महाजन

नगर : समाजात कुठेही दरी निर्माण होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री मंडळ याबाबत सकारात्मक आहेत. आपल्या बोलण्यातून तेढ निर्माण होता कामा नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी. हे माझे सर्वांना सांगणे आहे. तसेच आमच्या राजकीय नेत्यांनी एकमताने तोडगा काढला पाहिजे. निव्वळ राजकीय पोळी भाजण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मतांसाठी हे दुभाजन कोणीही करू नये. असे आवाहन भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले आहे.  

नक्की वाचा : ‘महाविकास आघाडीच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो’- शरद पवार

सर्वपक्षीय बैठकीतून आरक्षणावर तोडगा काढू (Girish Mahajan)

ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे प्राणांतिक उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. शुक्रवारी (ता.२१) मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर आणखी एक सरकारी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना येऊन भेटणार आहे. मात्र, त्यापूर्वीच येत्या अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल. असे आश्वासन भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे.

अवश्य वाचा : टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय;सूर्या-बुमराहची तुफानी खेळी

‘समाजात दरी निर्माण होता कामा नये’  (Girish Mahajan)

शुक्रवारी जालना आणि पुण्याला आम्ही गेलो होतो. यावेळी वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचे मी काल मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले. यावेळी जालना आणि पुण्याचे शिष्टमंडळ देखील सोबत होते. येत्या अधिवेशनात आम्ही बैठक घेणार आहोत आणि या संदर्भात ठोस पाऊल उचलत टिकणारे आणि समाजाचे समाधान होईल असेच आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे कुठेही समाजात दरी निर्माण होता कामा नये, ही देखील सरकारची भूमिका असल्याचेही गिरीश महाजन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here