Girish Mhajan : कर्जत : सध्या शैक्षणिक क्षेत्रात सर्वच ठिकाणी मोठी स्पर्धा असून यात जो शिकतो, निरंतर परिश्रम घेतो आणि अवलोकन करीत परीक्षेत सर्वोत्कृष्ट मांडतो. त्याला यश हमखास मिळते. यशाने हुरळून जायचे नाही. आणि अपयशाने खचू न जाता त्याला सामोरे जातो तोच खरा मनुष्य असतो. आयुष्याची जडण-घडणच चढ-उताराने सुरू होते. मात्र त्याला पाठ न दाखवता जो तोंड देतो त्याच्या यशाचा आलेख सर्वोत्तम ठिकाणी पहावयास मिळतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे (MPSC) सचिव गिरीश महाजन यांनी केले. ते कर्जत येथे रविशंकर विद्यामंदिराच्या (Ravi Shankar Vidya Mandir) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दहावीच्या विद्यार्थी (Student) निरोप समारंभप्रसंगी बोलत होते.
नक्की वाचा: इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा

आहे त्यात समाधान मानायला शिका
या कार्यक्रमासाठी मुंबई मंत्रालयातील आरोग्य विभागाचे उपसचिव विलास बेद्रे, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, पोलीस निरीक्षक कैलास काळे, कृषी अधिकारी सोन्याबापू
धनावटे, संस्थेचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे उपस्थित होते. यावेळी बोलताना उपसचिव विलास बेद्रे म्हणाले की, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कायम विद्यार्थी असतो. जे सभोवताली चांगले घडते त्यातून अनुभवाची शिदोरी मिळते. परिस्थिती कशीही असो पण जो त्यावर मात करतो, स्पर्धेत स्वताला झोकून देतो. तो निश्चित यशस्वी ठरतो. आई-वडील, शाळा, गुरूजन आणि आयुष्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगात सोबत असणाऱ्या सर्वांचे ऋण कधीच विसरु नका. कारण हीच माणसं जीवनाचे अनमोल साथीदार असतात. जे आहे त्यात समाधान मानायला शिका. स्पर्धा असावी पण ती जीवघेणी नसावी. जे मिळाले ते सर्वोत्तम समजून आयुष्य जगा आणि स्वताची प्रगती साधा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष परिश्रम (Girish Mhajan)
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सविता बळे, शबाना शेख, विद्यार्थी प्रतिनिधी यशराज थोरात, अनुष्का गदादे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका बनकर, संजय मडके यांच्यासह सोहम तापकीर, कार्तिकी देवकाते यांनी पार पाडले. तर आभार संस्थेचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे यांनी मांडले.



