Goa night club fire : नगर : गोव्यातील (Goa) अरपोरा परिसरातील एका नाईट क्लबला शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत (Goa night club fire) २५ जणांचा मृत्यू (Death) झाला असून अनेक जण जखमी (Injured) झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक चौकशीनुसार क्लबच्या तळघरात अडकल्यामुळे बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही आग क्लबच्या पहिल्या मजल्यावर सुरू झाली आणि नंतर संपूर्ण इमारतीत पसरली असा प्राथमिक अंदाज आहे.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
आगीचे कारण तपासण्यात येत आहे
या दुर्दैवी घटनेची माहिती देताना गोवा पोलीस महासंचालक आलोक कुमार म्हणाले की, अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये ही दुर्दैवी घटना रात्री १२.४० च्या आसपास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, आग्निशमक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले होते. आग आता आटोक्यात आली असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून घटनेचे कारण तपासण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाईट क्लबजवळील एका रेस्टॉरंटमधील सुरक्षा रक्षकाने सांगितले की, आम्हाला मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला होता.

अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही, (Goa night club fire)
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक चौकशीनुसार क्लबच्या तळघरात अडकल्यामुळे बहुतेक लोकांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही आग क्लबच्या पहिल्या मजल्यावर सुरू झाली आणि नंतर संपूर्ण इमारतीत पसरली असा प्राथमिक अंदाज आहे.



