Goa Pattern | श्रीगोंद्यात १ कोटी ८५ लाखांचा ‘गोवा पॅटर्न’ उद्ध्वस्त!

विदेशी मद्याचे तब्बल १,५०० बॉक्स आढळले

0

Goa Pattern | श्रीगोंदा: राज्यातील मद्य तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबईच्या भरारी पथकाने गुरुवारी (ता.१२) मध्यरात्री नगर-दौंड महामार्गावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. निमगाव खलु टोल नाक्यावर केलेल्या या धडक कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूने (Goa Pattern) खचाखच भरलेला कंटेनर जप्त करण्यात आला. १ कोटी ८५ लाख ४५ हजार रुपयांचा गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा हा प्रचंड साठा पाहून खुद्द अधिकारीही अवाक झाले. या कारवाईने अवैध मद्य तस्करी करणाऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अवश्य वाचा- जातेगाव ग्रामपंचायतमध्ये १८ दिव्यांगांना निधी वाटप; समृद्ध ग्राम अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विदेशी मद्याचे तब्बल १,५०० बॉक्स आढळले (Goa Pattern)

 गोव्याहून महाराष्ट्रात अवैध दारूची मोठी खेप येणार असल्याची पक्की खबर मुंबईच्या पथकाला लागली होती. त्यानुसार निमगाव खलु शिवारात रात्री १० च्या सुमारास पथकाने फिल्डिंग लावली. संशयास्पद वाटणारा सहा चाकी कंटेनर अडवण्यात आला. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कंटेनरचे सील तोडताच आतमध्ये विदेशी मद्याचे तब्बल १,५०० बॉक्स थप्पी लावून रचलेले आढळले. या कारवाईत चालक प्रेमकुमार जनकधारी सिंग याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकातील निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात, नवनाथ घोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. विजय ढवळे यांनी फिर्याद दिली असून, दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.