Godad Maharaj : कर्जत : ग्रामदैवत संत सदगुरू गोदड महाराज (Godad Maharaj) यांच्या १८८ व्या संजीवन समाधी सोहळा व पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (ता.६) कर्जत शहरात अभूतपूर्व असा भक्तिमय सोहळा पार पडला. श्री क्षेत्र मायंबा येथील बडेबाबा चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराजांच्या (Chaitanya Machindranath Maharaj) पवित्र पादुका यासह मांदळी येथील आत्माराम गिरी बाबा (Atmaram Giri Baba) यांच्या पवित्र पादुका या सोहळ्यासाठी कर्जतमध्ये दाखल झाल्या. या दोन्ही पादुकांचे आकर्षक सजवलेल्या रथात ठेवत मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हरिनामाच्या गजराने कर्जतनगरी दुमदुमली होती.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर
फटाक्यांची आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत
कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराज यांचा पालखी उत्सव सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या पालखी सोहळ्यासाठी प्रथमताच कर्जत नगरीत मच्छिंद्रनाथ महाराज आणि आत्माराम गिरी महाराज यांच्या पादुका कर्जत शहरात येताच फटाक्यांची आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. या पवित्र पादुका रथात विराजमान करीत ग्रामप्रदक्षिणेसाठी मिरवणूक काढण्यात आली.

हे देखील वाचा: दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या
ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक संपन्न (Godad Maharaj)
यावेळी सदगुरु गोदड महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय, आत्माराम गिरी महाराज की जय तसेच हरिनामाच्या गजराने जयघोषाने कर्जत शहर अक्षरशः भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. टाळ-मृदंगाच्या निनादात, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताका फडकावत आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भक्तिभावात मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणुकीत हजारो भाविक, विद्यार्थी, ग्रामस्थ, मानकरी पुजारी आणि वारकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रत्येकजण देहभान विसरत तल्लीन झाला होता. कर्जत शहरात आजपर्यंत कधीही न झालेला असा हा न भूतो न भविष्यती सोहळा पार पडला. मिरवणुकीनंतर संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात महाआरती होत शिपी आमटीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ शहर व परिसरातील हजारो भाविकांनी घेतला.



