Godavari River : कोपरगावात गोदावरीच्या महाआरतीचे आयोजन

Godavari River : कोपरगावात गोदावरीच्या महाआरतीचे आयोजन

0
Godavari River : कोपरगावात गोदावरीच्या महाआरतीचे आयोजन

Godavari River : कोपरगाव : येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे श्रावण महिन्याच्या (Shravan Month) प्रत्येक सोमवारी गोदावरीच्या (Godavari River) महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सोमवारी विवेक कोल्हे व रेणुका कोल्हे यांनी भगवान शंकराचे व गोदामातेचे पूजन करून गंगेची ओटी भरली. त्यानंतर महाआरती झाली. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी, बम बम भोले, हर हर महादेव, हर हर गंगेचा जयघोष, आसमंत दुमदुमून टाकणारा शंखनाद, यामुळे रंगलेल्या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महिलांसह भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

भाविकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद (Godavari River)

भाविक-भक्तांच्या उपस्थितीत पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी गोदामातेची‌ ओटी भरून, बम बम भोले, हर हर महादेव, शंख नादाच्या निनादात,फटाक्यांच्या आतषबाजीत, हर हर गंगेच्या जयघोषात गंगा गोदावरीची ओटी भरून सामूहिक महाआरती करण्यात आली. या महाआरतीला भाविकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला.

अवश्य वाचा: उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका

बोटीमधून फटाक्यांची आतषबाजी (Godavari River)

ही महाआरती सुरू असताना संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने गोदावरी नदीतील पाण्यात बोट सोडण्यात आली होती. या बोटीतील माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वत्र लक्ष ठेऊन त्या बोटीमधून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी सर्वांना श्रावणाच्या शुभेच्छा देत अपना सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो, असे म्हणत गोदावरी माता अशीच वाहत राहावी आणि हा परिसर सुजलाम सुफलाम होवो, अशी प्रार्थना  संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी गोदावरी मातेला यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here