Gold : 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

Gold : 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

0
Gold
Gold : 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

Gold : नगर : भारताची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India) सोन्याची खरेदी केली जात आहे. भारताने ब्रिटनमध्ये सोने ठेवले होते. हेच 100 टन सोने (Gold) आता भारतात आणण्यात आले आहे. 33 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या तिजोरीत एवढे सारे सोने जमा केले आहे. आता भारताने (India) खरेदी केलेले सोने ब्रिटनच्या तिजोरीत राहणार नाही. आता हेच सोने रिझर्व्ह बँकेच्या वॉलेट्समध्ये ठेवण्यात आले आहे.

Gold
Gold : 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हल्लाबोल

सोनं भारतात का आणले जात आहे?

भारताने अनेक टन सोनं विदेशात ठेवलं आहे. आता हेच सोनं रिझर्व्ह बँक आपल्या देशात परत आणत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत व्हावी म्हणून हा निर्णय घेतला जातोय. भारताच्या तिजोरीतील सोन्याची वाढ व्हावी आणि या सोन्याचा उपयोग भारतासाठीच व्हायला हवा, असा यामागचा उद्देश आहे.

Gold
Gold : 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

हे देखील वाचा: माझ्या मतदारसंघाप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचवणार का?; रोहित पवारांचा राणांना सवाल

भविष्यातही आणखी सोनं खरेदी करणार आबरीआय (Gold)

मिळालेल्या माहितीनुसार मार्चच्या शेवटपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे 822.1 टन सोनं होतं. यातील साधारण 413.8 टन सोनं बँकेने विदेशात ठेवले होते. याआधीच्या आर्थिक वर्षात आरबीआयने नव्याने 27.5 टन सोन्याची खरेदी केली होती. भविष्यातही आणखी सोनं खरेदी करण्याचा आरबीआयनचा कल आहे. 2023 सालाच्या तुलनेत RBI ने केवळ जानेवारी-मार्च या काळात साधारण दुप्पट सोन्याची खरेदी केली आहे. देश कठीण काळातून जात असेल किंवा काही आव्हान निर्माण झाल्यास या सोन्याची मदत होईल, असा यामागचा उद्देश आहे.

जगभरातील अनेक देश ब्रिटनच्या बँक ऑफ इंग्लंड या बँकेत सोनं ठेवतात. त्यासाठी या देशांना ब्रिटनच्या बँकेला पैसेदेखील द्यावे लागतात. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून भारताचे काही सोने ब्रिटनकडे आहे. आरबीआयने गेल्या काही वर्षांपासून सोन्याची खरेदी चालू केली आहे. त्यामुळे खरेदी केलेले सोने कोठे ठेवायचे, यावर सरकारकडून विचार केला जातोय. खरेदी केलेल्या सोन्यापैकी काही सोनं हे विदेशात ठेवलं जात होतं, त्यामुळे ते भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारला 1991 साली संकटकाळात सोनं गहाण ठेवावं लागलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here