Gold : नगरच्या सराफ बाजारात खळबळ, दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold : नगरच्या सराफ बाजारात खळबळ, दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

0
Gold : नगरच्या सराफ बाजारात खळबळ, दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Gold : नगरच्या सराफ बाजारात खळबळ, दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Gold : नगर : अहिल्यानगर शहरातील एका सराफ दुकानातील (Jewelry Shop) कारागिराने दोन किलो (Gold) २१ ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली असून पोलीस त्या संशयित आरोपींचा शोध घेत आहे..

नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील

कोतवाली पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

या प्रकरणी कृष्णा जगदीश देडगावकर (रा. सावेडी, अहिल्यानगर), यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, स्नेहा बेरा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा संशयित कारागीरांची नावे आहेत. फिर्यादी कृष्णा देडगावकर आणि त्यांचा भाऊ प्रतिक देडगावकर यांचे देडगावकर ज्वेलर्स नावाने सराफ बाजारात दुकान आहे.

अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

इतर कारागीरांचे मोबाईलही बंद असल्याने संशय (Gold)

दुकानाच्या तळमजल्यावर कारागीर दागिने बनवण्याचे काम करत होते. तसेच सोमनाथ सामंता आणि आन्मेश दुलोई हे दुकानासमोरील दुसरे सोनार विजय जगदाळे यांच्या दुकानाच्या ठिकाणी कारागीर म्हणून काम करत होते. रविवारी (ता. २६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी कृष्णा देडगावकर तळमजल्यावर गेले असता कारागीर दिपनकर माजी जागेवर नव्हता. फोन करून विचारणा केली असता तो दहा मिनिटांत येतो असे म्हणाला. परंतु बराच वेळ उलटूनही तो आला नाही आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला. त्याचवेळी इतर कारागीरांचे मोबाईलही बंद मिळाल्याने संशय निर्माण झाला. कारागीर सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले आहेत. या चोरीत एकूण २ किलो २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोख सोने चोरीस गेले असून त्याची एकूण किंमत १ कोटी १ लाख ५ हजार रूपये इतकी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.