Gold : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकात वृध्दाकडील सोन्याची माळ केली लंपास; भिंगार पोलिसात गुन्हा

Gold : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकात वृध्दाकडील सोन्याची माळ केली लंपास; भिंगार पोलिसात गुन्हा

0
Gold : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकात वृध्दाकडील सोन्याची माळ केली लंपास; भिंगार पोलिसात गुन्हा
Gold : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकात वृध्दाकडील सोन्याची माळ केली लंपास; भिंगार पोलिसात गुन्हा

Gold : नगर : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौक (Chandni Chowk Ahilyanagar) परिसरात एका अनोळखी महिलेने हातचलाखी करत एका सेवानिवृत्त व्यक्तीची सोन्याची (Gold) बोरमाळ आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांना निवेदन

फिर्याद दाखल

वेणु भागुजी पवार (वय ६२, रा. रंगभवन शेजारी, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वेणू पवार हे गुरूवारी (ता.५) चांदणी चौक परिसरातून जात होते. यावेळी एका अनोळखी महिलेने लबाडीच्या इराद्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रूपये किमतीची पाऊण तोळ्याची सोन्याची बोरमाळ आणि खिशातील दोन हजार रूपयांची रोकड, असा एकूण ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

अवश्य वाचा: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण: खासदार लंके

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (Gold)

चोरीचा हा प्रकार वेणु पवार यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले. पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस अंमलदार पठाण करीत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.