Gold Price: सोन्याची रेकॉर्डब्रेक भरारी! १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?

0
Gold Price: सोन्याची रेकॉर्डब्रेक भरारी! १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?
Gold Price: सोन्याची रेकॉर्डब्रेक भरारी! १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?

नगर : ऐन सणासुदीच्या काळात भारतात सोन्याच्या किमतीत (Gold Prive Increase) प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिका चीनमधील व्यापार तणाव, जागतिक अनिश्चिततेमुळे ही वाढ झाल्याचे बोलले जात आहे. सणसमारंभ (Festival Season) आणि लग्नसराईच्या काळात (Wedding Season) सोन्याच्या किमतींत रेकॉर्ड ब्रेक वाढ (Record-breaking growth) झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सोन्यासह चांदीचे ही भाव ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. इंडियन बुलियन असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव १ लाख २६ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला जात आहे.तर किलोमागे चांदीचा दर १ लाख ६१ हजार ६७० रुपयांवर पोहोचला आहे.

नक्की वाचा: पुण्यात मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची दारु पिऊन सहा गाड्यांना धडक

मागील २४ तासांपूर्वी (ता.१३) सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ५२० रुपये होता.आज तो १ लाख २६ हजार ५९० झाला आहे. म्हणजेच २४ तासात सोन्याच्या भावात झालेली वाढ ही २०७० आहे. काल दिवसभरात एक किलो मागे चांदीचा दर १ लाख ५४ हजार 600 रुपये होता.तो आज १ लाख ६१ हजार ६७० रुपये झाला आहे. म्हणजेच गेल्या २४ तासात चांदीच्या दरात ७,०७० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

अवश्य वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार   

जागतिक बाजारात अनिश्चिततेमुळे सोन्याची मागणी वाढली (Gold Price)

अमेरिका चीन व्यापार तणाव आणि अमेरिकन शटडाऊन या दोन घडामोडींचा परिणाम सध्या सोन्या-चांदीच्या किमतींवर होताना दिसत आहे.जगभरातील व्यापार तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमेरिकेने लादलेले टॅरिफ कर, अनेक देशांमधील युद्ध परिस्थिती, व्यापारी तणाव तसेच आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरात अस्थिरता आहे. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यामध्ये पैसे गुंतवत आहेत. याचा परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर झाल्याचे सांगितले जात आहे.

सोन्या चांदीच्या किमती कुठे किती ? (Gold Price)

मुंबई : १,२६, ५९० रु प्रति १० gm
दिल्ली : १,२६,६१० रु १० ग्रॅम
कोलकाता : १,२६,६६०
पुणे:१,२६,८७०
चेन्नई : १,२७,२४०