Gold Price:’ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ

0
Gold Price:'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ
Gold Price:'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतात पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ

Gold Price: भारतीय सैन्यानं (Indian Army) जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नुसार कारवाई करत पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईनंतर,पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला, तर भारतीय बाजार सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला आणि मजबूत राहिला.या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर (Gold Price) पुन्हा १ लाखांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

नक्की वाचा : भारताने पाकिस्तानला घरात घुसून मारलं;‘ऑपरेशन सिंदूर’ नेमकं काय ?   
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर पुन्हा १ लाखांच्या पुढे गेल्याचं पाहायला मिळालं. २३ एप्रिल रोजी म्हणजेच पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या पुढे गेला. महत्त्वाची बाब म्हणजे, जागतिक अनिश्चिततेमुळे,सोनं ही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे आणि लोक त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

अवश्य वाचा : ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय 

पुन्हा एकदा सोनं १ लाख पार (Gold Price)

बुधवारी (ता.८) भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. त्यानंतर सोन्याच्या किमतींनी थेट आभाळ गाठलं. दिल्लीत बुधवारी सोनं १ हजार रुपयांनी महागलं आणि प्रति १० ग्रॅम सोनं १ लाख रुपयांच्या पुढे गेलं. इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते,मंगळवारी (ता.६) ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९,७५० रुपये होता. जो एका दिवसानंतर म्हणजेच,बुधवारी १००० रुपयांनी वाढून १,००,७७० रुपये झाला.

बुधवारी ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या किमतीत १.५० रुपयांची वाढ झाली आणि ते १,००,३५० रुपये प्रति दहा ग्रॅम दरानं विकलं गेलं. यापूर्वी २२ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत १८०० रुपयांची मोठी वाढ झाली होती आणि ऐतिहासिक विक्रम गाठत सोनं १,०१,६०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत होतं.