Gold Price:सोन्याचे दर घसरले;तीन दिवसांत ४ हजार रुपयांची घसरण

0
Gold Price:सोन्याचे दर घसरले;तीन दिवसांत ४ हजार रुपयांची घसरण
Gold Price:सोन्याचे दर घसरले;तीन दिवसांत ४ हजार रुपयांची घसरण

Gold Price: मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसत होती.मात्र,गेल्या तीन दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठी घसरण (Fall in gold and silver prices) होताना दिसत आहे.त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसात सोन्याच्या भावात (Gold Rate) ४ हजाराने तर चांदीच्या भावात (Silver Rate) ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारामध्ये सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार   
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा परिणाम म्हणून जळगावच्या बाजारात सोनं आणि चांदी हे घसरले असल्याचे मानले जात आहे. आजचा सोन्याचा भाव जीएसटीसह ९१ हजार २६० तर चांदीचा भाव हा ९२ हजार ७०० असल्याच पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसात सोने व चांदीचा भाव घसरल्याने ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र,तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : ‘कोणतही डिपॉझिट घेऊ नका’;पुणे महानगरपालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस  

सोन्याचा दर प्रतितोळा ५५ हजारापर्यंत खाली येण्याची शक्यता (Gold Price)

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर प्रतितोळा ५५ हजारापर्यंत खाली येऊ शकतो,असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. सोन्याचा प्रतितोळा दर काही दिवसांपूर्वी ९६ हजारांवर पोहोचला होता. तेव्हापासूनच तज्ज्ञांनी आगामी काळात सोन्याच्या घरात खूप मोठी घसरण होईल,असे म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले असले तरी एरवी झटक्यात वाढणारे सोन्याचे भाव उलट कमी होत आहेत.

सोन्याच्या दरात घसरण का ? (Gold Price)

अमेरिकेतील मॉर्निंगस्टारचे रणनीतीकार जॉन मिल्स यांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या भावात ३८ टक्क्यांची घसरण होऊ शकते. सोन्याचे दर घसरण्याचं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. २०२४ च्या दुसर्‍या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा ९५० डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठी ९ टक्क्यांनी वाढून २,१६,२६५ टन झाला आहे. ऑस्ट्रेलियानं सोन्याचे उत्पादन वाढवलं आहे. तसेच रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here