Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ;नवीन दर काय ? 

0
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ;नवीन दर काय ? 
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ;नवीन दर काय ? 

Gold Rates Today : देशभरात एकीकडे लग्नसराईचा काळ सुरु असताना सोन्या चांदीच्या दरांनी पुन्हा उसळी (Gold and silver prices rise again) मारली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराने (Gold Rates Today)जीएसटीसह तब्बल १ लाख ३६ हजार रुपये तर चांदीने १ लाख ९५ हजार रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरवाढीची चर्चा सुरू असताना, आज एकाच दिवसात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचे टेन्शन वाढलं आहे.

नक्की वाचा: सक्षम ताटे प्रकरणातील मारेकऱ्याचं इन्स्टाग्राम अकाउंट लाइव्ह,नेमका प्रकार काय ?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम (Gold Rates Today)

सोन्या-चांदीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे प्रमुख ठरत असल्याचे व्यावसायिक सांगतात.जागतिक पातळीवर गुतंवणूकदार,आणि ग्राहकांचा डॉलरवरचा विश्वास डळमळीत होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणुकी सुरु केल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून, जळगावसारख्या मोठ्या सुवर्ण बाजारात दर झपाट्याने वाढताना दिसत आहेत.

अवश्य वाचा: मोदी सरकारनं ‘मनरेगा’चं नाव बदललं;नवीन नाव काय ?  

सोने दर वाढीची करणे नेमकी काय आहेत ? (Gold Rates Today)

१. डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण
२. अमेरिकेच्या फेडरल बँकेचे व्याजदर कपात, यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळाले आहेत. यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

एकाच दिवसात सोन्याच्या मोठी दरवाढ (Gold Rates Today)

आज एकाच दिवसात सोन्याच्या दरात सुमारे ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. कालपर्यंत सुमारे १ लाख ३३ हजार रुपये असलेला सोन्याचा दर थेट १ लाख ३६ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे चांदीच्या दरातही तब्बल १० हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. चांदीने १ लाख ९५ हजार रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे. ही दरवाढ गेल्या अनेक वर्षांतील सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे.