नगर: सोने आणि चांदी खरेदीदारांना (Gold Silver Price Today) मोठा दिलासा देणारी बातमी आहे. सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर,आज मंगळवारी सोन्यासह चांदीच्या दरात पुन्हा घसरण (Silver prices fall again along with gold) झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर उघडताच ४,६०० रुपयांपेक्षा जास्त घसरले. तर सोने ३८,००० रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहे.
नक्की वाचा: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
सोने-चांदीचे आजचे दर किती ? (Gold Silver Price Today)
आज मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या व्यापार दिवशी, एमसीएक्स वर चांदीचा भाव उघडताच घसरला. चांदीचे भाव काल (ता.१६) सोमवारी २,३९,८९१ रुपये प्रति किलोवर बंद झाली आणि त्या तुलनेत, ती उघडताच २,३५,२०६ रुपयांवर घसरली. परिणामी, १ किलो चांदीची किंमत एकाच वेळी ४,६८५ रुपयांनी घसरली आहे. २९ जानेवारीला चांदीचा भाव पहिल्यांदाच ४,२०,०४८ रुपये विक्रमी उच्चांक पोहोचला होता. या उच्चांकानंतर, चांदी १,८०,१५७ रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अवश्य वाचा: अजित पवारांच्या निधनानंतर ‘त्या’७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला?
दर घसरणीमागे कारण काय ? (Gold Silver Price Today)
चांदीच्या किंमती नंतर सोन्याच्या किमतीतही सातत्याने घसरण होत आहे. सोन्याच्या वायदा किमती त्याच्या मागील बंद १,५४,७६० रुपयांवरून १,५३,५५० रुपयांवर आल्या. याचा अर्थ एमसीएक्स सोन्याचा दर १,२१० रुपयांनी घसरला. २९ जानेवारीला, चांदीच्या बरोबरीने सोन्याच्या दरानेही उच्चांक गाठला. रॉकेट वेगाने वाढ होत असताना, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,९३,०९६ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. या पातळीवर पोहोचल्यानंतर, सोन्यात घसरणीची मालिका सुरू झाली, ज्याचे परिणाम अजूनही दिसून येत आहेत. सोने त्याच्या उच्चांकावरून ३८,३३६ रुपयांनी घसरले आहे. या घसरणीमागचं मुख्य कारण ‘लूनर न्यू इयर’निमित्त चीनसारख्या आशियाई बाजारांमध्ये असलेल्या सुट्ट्या मानलं जात आहे.



