Gold Silver Rate:बापरे!सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त,तर चांदीची २० हजार रुपयांनी घसरण 

0
Gold Silver Rate:बापरे!सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त,तर चांदीची २० हजार रुपयांनी घसरण 
Gold Silver Rate:बापरे!सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त,तर चांदीची २० हजार रुपयांनी घसरण 

नगर : सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Rate) गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी सुरु होती. दररोज सोने आणि चांदीचे दर नवे उच्चांक गाठत होते. अखेर गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण (Gold and silver prices fall) झाल्याचं पाहायला मिळाले आहे. चांदीचे दर तब्बल २० हजार रुपयांनी कोसळलेत. तर, सोन्याचे दर ४ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीच्या ५ मार्चच्या एक्सपायरीच्या वायद्याचे दर बुधवारी ३,२५,६०२ रुपयांवर पोहोचले होते. त्यात आज १९,८४९  रुपयांची घसरण (Decline) होऊन ते ३,०५,७५३ रुपयांवर पोहोचले आहेत.

नक्की वाचा: ब्रेकिंग!अहिल्यानगरमध्ये महापौर पद ‘या’ प्रवर्गासाठी राखीव

सोने चांदीच्या दरातील घसरणीचे कारण काय ? (Gold Silver Rate)

सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. सोन्याचे दर ४०८५ रुपयांनी कमी होऊन १,४८,७७७ रुपयांवर आले आहेत. सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण डोनाल्ड ट्रम्प यांच ग्रीनलँड आणि यूरोप संदर्भातील बदललेलं धोरण आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर देखील घसरले आहेत. सराफा बाजारात चांदीचा दर १५,५१३ रुपयांनी घसरला. जीएसटीसह चांदीचा दर ३,१२,६९१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात देखील २७२८ रुपयांची घसरण झाली. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर १,५६,०४३ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर २४९९ रुपयांनी कमी होऊन १,३८,७७३ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर १,४२,९३६ रुपये आहे.

अवश्य वाचा: विद्यार्थ्यांनो ‘अपार आयडी’ काढले का ?,३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत

राज्यातील सोन्या- चांदीचे दर काय ? (Gold Silver Rate)

राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति तोळा १,५६,६१० रुपये इतका आहे. तर दगिन्यांमध्ये वापरले जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,४३,६१० रुपये इतका आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो ३,२५,००० रुपये इतका आहे. जो कालच्या तुलनेत ५ हजार रुपयांनी कमी झाला आहे.