Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात चढ -उतार होत असताना आज भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ (Increase in gold and silver prices) पाहायला मिळाली आहे. सोन्याचे एका तोळ्याचे दर २८८३ रुपयांनी महागले आहेत. चांदीच्या दरात एका दिवसात १४,४७५ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा जीएसटी शिवायचा दर २,५७,२८३ रुपये किलो इतका आहे. जीएसटीसह (GST Rate) एक किलो चांदीचा दर २,६५,००१ रुपये किलो आहे. तर,सोन्याचा जीएसटीशिवायचा एका तोळ्याचा दर १४,००,०५ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर १४,४२,०५ रुपयांवर पोहोचला आहे.
नक्की वाचा : मोठी बातमी!राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
शुक्रवारी चांदीचे दर २,४२,८०८ रुपये किलोवर होते. तर,सोन्याचा दर १,३७,१२२ रुपये एक तोळा होता. जीएसटी शिवायचा सोन्याच्या दराचा उच्चांक मोडला गेला आहे. जीएसटी शिवाय एक तोळे सोन्याचा यापूर्वीचा उच्चांक १,३८,१८१ रुपये होता. चांदीच्या दराने देखील ७ जानेवारीचा २,४८,००० चा उच्चांक मोडला आहे. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर १,४३,६२७ रुपये किलो आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात २,६४१ रुपयांची वाढ झाली आहे.
आजचा सोन्याचा दर किती ? (Gold Silver Rate)
आज एक तोळे सोन्याचा दर १,८२,२४५ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह २२ कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा दर १,३२,०९२ रुपये किलो आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १८ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर १०,५००४ रुपये इतका आहे. जीएसटीसह याचा दर १०,८१,५४ रुपये आहे. १४ कॅरेट सोन्याच्या दरात १६८७ रुपयांनी वाढ झाली असून एका तोळ्याचा दर ८१,९०३ रुपये आहे.
अवश्य वाचा: ‘साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरवात करून गावांना दुष्काळमुक्त करणार;राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही
सोन्याच्या दरात एवढी तेजी का ? (Gold Silver Rate)

सोने आणि चांदीच्या दरातील वाढीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारणं देखील आहेत. २०२५ मध्ये सोन्याच्या दरात ६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर ४६०० डॉलर प्रति औंस इतका आहे. तर चांदीचा दर ८४.५ डॉलर प्रति औंस इतका आहे. भुराजनैतिक संघर्षामुळं निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांची निवड करतात. अमेरिकेच्या व्याज दरातील कपातीची आशा आणि अमेरिकन डॉलरमधील नरमाई हे देखील एक कारण आहे. चांदीचे दर वाढण्याचं कारण म्हणजे औद्योगिक कारणासाठी चांदीचा वापर वाढला आहे. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चांदीचा औद्योगिक वापर वाढला आहे. यामुळे चांदीच्या दरावर दबाव आहे.



