Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन

राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झाले आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या (Metrological Department) पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर (Dr. Hosalikar) यांनी दिली आहे.

0
Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन
Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन

Maharashtra Monsoon : राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Rain) महाराष्ट्रात आगमन झाले आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या (Metrological Department) पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर (Dr. Hosalikar) यांनी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम  विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

नक्की वाचा : सुनिता विल्यम्स यांची तिसऱ्यांदा गगन भरारी!

आज आणि उद्या राज्यात जोरदार पाऊस (Maharashtra Monsoon)

पावसाच्या आगमनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

अवश्य वाचा : महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल ‘रांगडा’अनुभव; चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊास झालाय. याचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरू होत्या. संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत. तसेच भाजीपाला पिकांचंही नुकसानं झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here