Gold Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज!सोन्याच्या दरात मोठी घसरण

सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे

0
Gold Price:सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज!सोन्याच्या दरात मोठी घसरण
Gold Price:सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुडन्यूज!सोन्याच्या दरात मोठी घसरण

नगर : सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण (Decline) झाली आहे. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा दर हा ६४००० रुपयांवर आला आहे. तर मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ६९६०२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तो आज २४ जुलै रोजी सकाळी ६९१९४ रुपयांवर घसरला आहे.

नक्की वाचा : मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे

सोन्याच्या दरात घसरण का ? (Gold Price)

सरकारने अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे, त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आज सोन्याचा भाव ६९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव ८४ हजार रुपये प्रति किलोच्या वर पोहोचला आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६९,१९४ रुपये आहे. तर ९९९ शुद्ध चांदीची किंमत ८४८९७ रुपये प्रति किलो आहे.

काल (ता.२३) संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ६९,६०२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आज २४ जुलैच्या सकाळी ६९,१९४ रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. तुम्हाला जर लेटेस्ट सोन्या चांदीचे दर जाणून घ्यायचे असतील तर,तुम्ही ८९५५६६४४३३ नंबरवर मिस कॉल देऊ  शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी  www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता.

अवश्य वाचा : अर्थसंकल्पात मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचं शैक्षणिक कर्ज

मुंबईत पाच हजार रुपयांनी सोने स्वस्त (Gold Price)

अर्थसंकल्पात सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली आहे. ती नऊ टक्क्यांवर खाली आली आहे. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी सहा टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे. त्यामुळे, मुंबईत पाच हजार रुपयांनी सोने स्वस्त झालं आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात पाच हजार रुपयांची घट झाल्याचं गोल्ड असोसिएशनचे प्रवक्ते आणि मुंबईतील सुवर्ण व्यापारी कुमार जैन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here