MSEB Contract Workers : वीज कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर (Good News) आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा (Salary Increase) केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता १९ टक्क्याने वाढ केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतनवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे.
नक्की वाचा : सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक
वीज कर्मचाऱ्यांची पगारवाढ मार्च २०२४ पासून लागू होणार (MSEB Contract Workers)
ही पगारवाढ मार्च २०२४ पासून लागू होणार आहे. वीज कर्मचाऱ्यांची पहिली पगारवाढ देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. आरोग्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘टॉप अप’ करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत. वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात आज एक बैठक पार पडली. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थितीत, धनंजय मुंडे देखील ऑनलाईन उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘अजित पवार मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत’- छगन भुजबळ
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ (MSEB Contract Workers)
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी याबाबदल माहिती दिली.
महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने केलेल्या या आंदोलनाला यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिगृह येथे झालेल्या बैठकीत या कामगारांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या मागण्या प्रलंबित होत्या. सरकारच्या या निर्णयामुळे महानिर्मिती कंत्राटी कामगारांनी आनंद व्यक्त केला.