Gold Price: खुषखबर! सोनं झालं स्वस्त,दरात ‘एवढ्या’ रुपयांची घसरण

भारतात सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घसरण झालीय. या घसरणीनंतर देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचा दर हा ७३ हजार रुपयांच्या खाली आला आहे.

0
Gold Price
Gold Price

नगर : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कारण सोन्याच्या दरात (Gold Rate) पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाली आहे.  त्यामुळं आता राजधानी  दिल्लीत १० ग्रॅम सोन्याचा दर हा ७२,९६० रुपयांवर आला आहे. तर चांदीचा दर हा ८७,३०० रुपये किलो झाला आहे.

एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घसरण झालीय. या घसरणीनंतर देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचा दर हा ७३ हजार रुपयांच्या खाली आला आहे.

नक्की वाचा : गाझा युद्धात नागपूरच्या सुपुत्राला वीरमरण; कर्नल वैभव काळे यांचा हल्ल्यात मृत्यू

दिल्लीत सोन्याचे दर किती ? (Gold Price)

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुड रिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव देशभरात सरासरी ४०० रुपयांनी घसरला आहे. तर दिल्लीत सोने ४३० रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त झाले आहे. त्यानंतर दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर सोन्याची किंमत ६६,९००रुपये प्रति दहा ग्रॅमवर आली आहे.

अवश्य वाचा : मतदान जनजागृतीसाठी कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल

मुंबईतील सोन्याचे दर (Gold Price)

मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,१४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,२४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. आता अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ६६,७९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,८६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here