Gopichand Padalkar : नगरचं नाव बदलल्यावर गोपीचंद पडळकर म्हणाले…

0
Gopichand Padalkar

Gopichand Padalkar : नगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावे, अशी मागणी भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)राम शिंदे (Ram Shinde) यांनी पहिल्यांदा केली होती. राज्य सरकारने आज आदेश काढून नगरचे नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) केले आहे. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळला.

हे देखील वाचा : अहमदनगरचं नामांतर आता ‘अहिल्यानगर’ हाेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

आमदार जगताप यांच्याकडूनही नामांतराचे निवेदन


चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहमदनगर शहराचे नामांतर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नामांतराचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने नगर महापालिकेला तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने नगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून त्याचा ठराव राज्य सरकारकडे पाठविला होता. तसेच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या नामांतराचे निवेदन काल (मंगळवारी) दिले होते. त्यानुसार आज राज्य सरकारने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन नामांतराला मंजुरी देण्यात आली आहे.

Gopichand Padalkar

 हे देखील वाचा : भाजपकडून डॉ. सुजय विखे पाटलांना उमेदवारी

अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान (Gopichand Padalkar)


यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, हिंदू राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. मुघलांकडून हिंदू धर्मावर, हिंदू संस्कृतीवर आक्रमणे होत होती. तेव्हा हिंदू संस्कृतीमध्ये प्राण फुंकण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांनी देशातील हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला. घाट बांधले, बारवा बांधल्या. त्यांनी प्रचंड मोठे काम केले. त्यांचे कार्यस्थळ संपूर्ण हिंदुस्थान होतं. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला होता. म्हणून आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मागील वर्षी ३१ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे आले होते. त्यावेळी त्यांंनी नामांतराचे आश्वासन दिले होते.


ते पुढे म्हणाले की, आश्वसानानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अहमदनगरच्या नामांतराला मंजुरी दिली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा म्हणी प्रमाणे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काम केले आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here