Gopichand Padalkar: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर 

0
Gopichand Padalkar: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत - गोपीचंद पडळकर 
Gopichand Padalkar: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत - गोपीचंद पडळकर 

Gopichand Padalkar : मुस्लिमांना (Muslims) भारत हा युद्ध भूमी (Battleground) वाटतो देश वाटत नाही. त्यांना देशात ठेवलंच नाही पाहिजे,असं स्वत:डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत,असं विधान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे. अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून त्या चिठ्ठ्या भिरकावल्या प्रकरणी शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या समारोपप्रसंगी झालेल्या सभेत आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.

आम्ही बोललो की, लोक म्हणतात भाजपवाल्यांना हिंदू मुस्लिम करण्याची सवय आहे. परंतु,आता संग्राम जगतापही बोलत आहेत हे तरी लक्षात घेऊन तुम्ही गंभीर व्हा, मित्रांनो असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रोश मोर्चात जोरदार घणाघात केला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.

नक्की वाचा: ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग;जालना शहरात घडली घटना     

ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा (Gopichand Padalkar)

गोपीचंद म्हणाले की, ज्या ज्या दुकानांवर अहमदनगर नावाची पाटी दिसेल, त्या दुकांनांवर शॉप कायद्यानुसार तक्रार दाखल करा आणि ही दुकानं उध्वस्त करा. तसेच इथलं खाता, इथेच राहता आणि दुसऱ्या देशाचं कौतुक करता हे खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हाला राहायचं असेल तर इथले नियम लागू होतील.अन्यथा, तुम्ही तुमची बॅग भरा आणि निघा असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत. तसंच, तुम्ही जर असले चाळे येथे केले तर कुणीही हे सहन करणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त जमीन जिहाद होत आहे. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. ही काय तुमच्या बापाची जागा नाही. माझा जन्मदाता बाप वेगळा असला तरी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आंबेडकर हे सुद्धा माझे बाप आहेत,असंही पडळकर म्हणाले आहेत.

अवश्य वाचा: अभिषेक शर्माच्या वादळात पाकिस्तानचा पालापाचोळा

‘त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’- गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)

आज महाराष्ट्रातील सर्व हिंदू लोकांच्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असला पाहिजे. त्यांच्यामुळे आज आपल्याला ही संधी मिळाली आहे. कोण पिलावळ दोन दिवसांपूर्वी इथ सभेत आली होती. त्यांनी आम्ही अहिल्यानगर बोलणार नाही अशी भूमिका घेतली, त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच पहिल्यांदा राष्ट्र, धर्म आणि जाती अशी आपली रचना आहे. त्यामुळे जात जपली पाहिजे असंही ते म्हणालेत.