
Gopichand Padalkar new song : नगर : गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे (Gopichand Padalkar new song) ते चर्चेत आले आहे. “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” असे या गाण्याचे बोल आहेत. गोपीचंद पडळकर हे भाजपचे (BJP) आमदार आहेत. त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ते ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी आपली वेगळीच बाजू सर्वांसमोर आणली आहे.

अवश्य वाचा: उपमुख्यमंत्रीपदानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत
या गाण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी केलेला अभिनय एखाद्या अनुभवी कलाकाराप्रमाणे जाणवत आहे. या गाण्यामध्ये अत्यंत भव्य सेट लावून अनेक कलाकारांसह चित्रिकरण करण्यात आले आहे. यात पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत दिसत आहेत. गाण्याचे लेखन सचिन माळी यांनी केले असून गाणं मिलिंद शिंदे यांनी गायलं आहे. तर मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव
सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ (Gopichand Padalkar new song)
गाणे प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या 2 दिवसात 10 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे. त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे गाणे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. गोपीचंद पडळकर नेहमीच धनगर समाज आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवरून आक्रमक असतात. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा होळकरशाहीच्या इतिहासाला उजाळा देत आपला स्वाभिमानी वारसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


