Gopichand Padalkar:’ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा’- गोपीचंद पडळकर

0
Gopichand Padalkar:'ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा'- गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar:'ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा'- गोपीचंद पडळकर

नगर : ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही निवडून तरी आले असते का? ईव्हीएम संदर्भात बोलणं म्हणजे विरोधकांचा बिनडोकपणा आहे. विरोधक दिवाळीच्या दिवशी शिमगा करत आहेत, हे चुकीचं असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली.

नक्की वाचा :‘आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व हरपलं’;विखेंकडून श्रद्धांजली

शरद पवारांसह राहुल गांधींना लगावला टोला (Gopichand Padalkar)

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं म्हणून झालेल्या आंदोलनाच्या मुद्यावर देखील गोपीचंद पडळकरांनी टीका केली. तुम्ही तुमचंच प्रति सरकार बनवा. मारकडवाडी पॅटर्ननंच तुम्ही आता निवडून येऊ शकता. तुम्हाला जनतेनं नाकारलं आहे. तुमच्या प्रति सरकारमध्ये शरद पवारांना निवडून आणा आणि सहा महिने पंतप्रधान बनवा. तर राहुल गांधी यांना पुढे साडेचार वर्ष द्या. मारकडवाडीतील शेतातच शपथ द्या,असा खोचक टोला पडळकरांनी लगावला. तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर लोकांना देखील संधी द्या,असं म्हणत पडळकरांनी मविआच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.

अवश्य वाचा : काँग्रेस खासदाराच्या जागेवर सापडले नोटांचे बंडल;राज्यसभेत गोंधळ

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर संशय (Gopichand Padalkar)

दरम्यान, सध्या राज्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येताना दिसत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देखील केली जात आहे. तसेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर संशय देखील व्यक्त केला जात आहे. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here